Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

Nillu And Billu: निल्लु आणि बिल्लु
Nillu And Billu: निल्लु आणि बिल्लु
Nillu And Billu: निल्लु आणि बिल्लु
Ebook65 pages26 minutes

Nillu And Billu: निल्लु आणि बिल्लु

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

थोडासा क्रूर व खोडकर शाळकरी मुलगा निलेश उर्फ निल्लु आपल्या पाळीव मांजराला ‘बिल्लु’ला क्रूरपणे वागवत असतो. त्यामुळे त्याचे पप्पा त्याला डॉ. कानपिळेंच्या सुधारशाळेत पाठविण्याचे ठरवितात. अचानक त्याच्या आयुष्यात एक विचित्र घटना घडते, ज्यामुळे त्याचे आयुष्य बदलून जाते. त्याचे आयुष्य बदलून टाकणारी ती विचित्र घटना काय? ते जाणण्यासाठी वाचा ही कथा...

Languageमराठी
Release dateAug 25, 2013
ISBN9781301425396
Nillu And Billu: निल्लु आणि बिल्लु
Author

स्नेहलजी

SnehalG स्नेहलजी, is a retired professor, who finds joy in writing and have published four Marathi e-books on Smashwords.१. कायापालट : A Marathi Novel which can be downloaded at https://www.smashwords.com/books/view/471394, Its also is available in print.२. अज्ञातवास : A Marathi Novel published as Ebook which can be downloaded at https://www.smashwords.com/books/view/538239३. निल्लु आणि बिल्लु : A children book which can be downloaded at https://www.smashwords.com/books/view/350889४. एक विलक्षण उड्डाण : A Marathi adventure book which can interest teenagers. https://www.smashwords.com/books/view/808912The writer is lives in India and keeps visiting her son in USA frequently.Contact : shabdavishwa@gmail.com, snehal.kg@gmail.com

Related to Nillu And Billu

Related ebooks

Reviews for Nillu And Billu

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    Nillu And Billu - स्नेहलजी

    निल्लु आणि बिल्लु

    स्नेहलजी

    प्रताधिकार © स्नेहल घाटगे 2013

    या लिखाणाचे सर्व प्रताधिकार हक्क लेखिकेकडे स्वाधीन आहेत. यातील मजकूर मूळ, खंडित अथवा संक्षिप्त अशा कोणत्याही स्वरूपात प्रसिद्ध करता येणार नाही. तसेच लेखिकेच्या पूर्वपरवानगीशिवाय तो संपूर्ण, खंडित अथवा संक्षिप्त अशा स्वरूपात कुठल्याही इतर भाषेत अनुवादित अथवा रूपांतरित करता येणार नाही.

    संपर्क : shabdavishwa@gmail.com

    प्रस्तुत कथानक हे लेखिकेच्या कल्पनेतून साकारलेले विश्व आहे. कथानकात घडलेल्या घटना व त्यात सहभागी पात्रे ही सर्व काल्पनिक आहेत. त्यातील घटनांचे वा पात्रांचे प्रत्यक्षातील घटनांशी वा कोणा व्यक्तींशी काही साधर्म्य आढळलेच तर तो केवळ विरळा योगायोग समजावा...

    ***

    निल्लु आणि बिल्लु

    मुलांनो, तुम्ही निलेशला ओळखता?

    नाही ना? हा तोच निलेश आहे ज्याला त्याचे मित्र ‘निल्लु’ या नावाने हाक मारतात.

    पण आता त्याची गोष्ट ऐकल्यावर मात्र तुम्हीही त्याला ओळखू लागाल.

    तुम्ही केस तर खूपवेळा कापून घेतले असतील आणि त्यावेळी तुम्हाला दुखलेही नसेल. कारण केस कापून घेणे ही तशी जास्त दुखणारी गोष्ट नाही. तुम्ही आपल्या पप्पांना मिशा कापतानाही पाहिले असेल. मिशा कापतानाही दुखत नाही.

    पण तुम्ही कोणाला गोल वाटीसारख्या आकाराचे कडक बूट घालून चाललेले पाहिले आहे? नाही ना? कारण पाहणा-यासाठी ही गोष्ट कितीही मजेशीर असली तरी गोल लाकडी बूट घालून चालण्याचा प्रयत्न करणे ही स्वत:साठी नक्कीच दुखणारी गोष्ट आहे.

    तसेच तुमच्या त्वचेवर जर मऊ लोकरीचे छानसे जाड आवरण असेल आणि त्यासकट जर कोणी तुम्हाला पोहायला लावले तर असे पोहणेही अत्यंत त्रासदायक आहे. आणि जर तुम्हाला शेपटी असेल तर तो सर्वस्वी तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे; पण त्या शेपटीला जर कोणी एखादा रिकामा पत्र्याचा डबा बांधेल तर तुम्हाला ते कदाचित आवडणार नाही हेही समजू शकते. तरीही शेपटी असणारा व त्याला रिकामा डबा बांधणारा या दोघांचे दृष्टिकोन समजणे पाहणा-या तिस-याला मात्र अवघड जाते.

    तर आता तुम्ही निलेशची गोष्ट वाचून पहा तुम्हाला त्याचा दृष्टिकोन समजतो का?

    हातात कात्री धरलेल्या निलेश उर्फ निल्लुच्या दृष्टीने बिल्लुराजाच्या मिशा कापून त्या एक इंचाने कमी करणे ही जगातली अत्यंत नैसर्गिक गोष्ट होती. कारण खेळ किंवा जगण्याच्या रोजच्या गंभीर प्रयत्नांमध्ये बिल्लुराजाला या मिशा किती उपयोगी आहेत हे निलेशला बिलकूल माहीत नव्हते. तसेच रंगपंचमीच्या वेळी बिल्लुराजाला रंगीत पाण्याने भरलेल्या मोठ्या पिपात फेकणे हा सुद्धा निलेशसाठी एक मनोरंजक खेळ होता. अर्थात बिल्लुराजाने हे एकदाच घडू दिले होते. बिल्लुराजाच्या नख्यांना शेंगाची रिकामी जाड टरफले चिकटवून त्याला चालायला लावणे हाही निलेशसाठी खेळच होता.

    पण अरेच्या! तुम्ही बिल्लुराजाला नक्कीच ओळखत नाही. बिल्लूराजा हा सर्वांचा आवडता बोका होता.

    निलेश उर्फ निल्लु जसा एक हुशार व धोरणी

    Enjoying the preview?
    Page 1 of 1