Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

का चा शोध (why?)
का चा शोध (why?)
का चा शोध (why?)
Ebook47 pages18 minutes

का चा शोध (why?)

By AJ

Rating: 4 out of 5 stars

4/5

()

Read preview

About this ebook

आजी गेली . आयुष्यभर तिने आम्हा नातवंडांवर खूप माया केली . आयुष्यभर ती अत्यंत साधेपणाने जगली . सदैव “तू ” चाच विचार तिने केला. “मी माझे” विचार तिला शिवताना कधी दिसला नाही. एकदा ICU मध्ये तिला भेटायला गेलो तेंव्हा म्हणाली “तू जेवलास का ?” या तिच्या तीन शब्दातच डोळे पाणावले . तिचा जीवनपट झरझर डोळ्यासमोरून गेला .साधे , निःस्वार्थी , इतरांसाठी वाहिलेले जीवन.
पुढे तिच्या अंत्य संस्कारांच्या वेळी मनात काहूर उठले. स्वतःच्या विषयी , स्वतःच्या जीवनसरणी विषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले. जीवनाने ओसंडून वाहणारी आजी आज शांत होती . माझे पुढे काय होणार ते भीषण सत्य ती निपचित राहून सांगत होती . नेहेमी माझ्यावर माया करणारी आज मला प्रचंड अस्वस्थ करत होती.
आणि मी करंटा, नेहेमी स्वार्थी विचार करणारा , आज सुद्धा स्वतःच्याच विवंचनेत .
हे कुठेतरी बदलायला हवे . जीवन न संपणाऱ्या अपेक्षांची यादी न राहता , आजी सारखी खळाळत वाहणारी नदी असायला हवे . सतत मी माझे ची विवंचना न राहता आनंद ,समाधानाची मालिका असायला हवे. “माझे कसे होईल?” पेक्षा “सर्व मंगल” चा जप असायला हवे. त्या साठी जीवनाची रहस्ये शोधायला हवीत.“का चा शोध?”घ्यायला हवा. अंतर्मुख व्हायला हवे .
आणि जेव्हा स्वतःच्या अस्तित्वात पाहायला सुरवात केली तेंव्हा हळूहळू लक्षात येवू लागेले की या साडे पाच फुट देहा मागे “मन ” नावाचा विस्वीर्ण समुद्र आहे. आणि त्यात अनेक रहस्य दडलेली आहेत जी आपले बाह्य जीवन घडवत असतात . खरे जीवन तर आत मनातच असते . जे बाहेर दिसते ते फक्त प्रतिबिंब असते.
इथे हे ११ लेख प्रस्तुत करत आहे. जे अत्यंत साध्या शब्दात मनाच्या खोल समुद्रात शिरून “का चा शोध ” घेण्याचा प्रयत्न करतील . हे विचार पटतीलच , आवडतीलच असे नाही . पण एक गोष्ट निश्चितच सांगता येईल , की मनात खोल वर दडलेली काही गुपिते समोर येवून उभी राहतील . आज आणि आत्ता .

Languageमराठी
PublisherAJ
Release dateAug 31, 2014
ISBN9781310898068
का चा शोध (why?)

Read more from Aj

Related to का चा शोध (why?)

Related ebooks

Reviews for का चा शोध (why?)

Rating: 4 out of 5 stars
4/5

1 rating0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    का चा शोध (why?) - AJ

    का? चा शोध

    जीवन न संपणाऱ्या अपेक्षांची यादी न राहता, खळाळत वाहणारी नदी असायला हवे. सतत मी माझे ची विवंचना न राहता आनंद, समाधानाची मालिका असायला हवे. जीवनाची रहस्ये शोधायला हवीत.का चा शोध?घ्यायला हवा.

    परिचय

    अजय जोगळेकर

    शाळा – गोखले शाळा, बोरीवली

    महाविदयालय – MVLU, Fr. C. R. college of Engg.

    व्यवसाय – व्यवस्थापक कवची ग्रुप

    लेखक – सहज सफलता

    साधक – विपासना साधना

    email – ajayjoglekar42@gmil.com

    आक्का

    वाडू आई

    संदर्भ

    आजी गेली . आयुष्यभर तिने आम्हा नातवंडांवर खूप माया केली . आयुष्यभर ती अत्यंत साधेपणाने जगली . सदैव तू चाच विचार तिने केला. मी माझे विचार तिला शिवताना कधी दिसला नाही. एकदा ICU मध्ये तिला भेटायला गेलो तेंव्हा म्हणाली तू जेवलास का ? या तिच्या तीन शब्दातच डोळे पाणावले . तिचा जीवनपट झरझर डोळ्यासमोरून गेला .साधे , निःस्वार्थी , इतरांसाठी वाहिलेले जीवन.

    पुढे तिच्या अंत्य संस्कारांच्या वेळी मनात काहूर उठले. स्वतःच्या विषयी , स्वतःच्या जीवनसरणी विषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले. जीवनाने ओसंडून वाहणारी आजी आज शांत होती . माझे पुढे काय होणार ते भीषण सत्य ती निपचित राहून सांगत होती . नेहेमी माझ्यावर माया करणारी आज मला प्रचंड अस्वस्थ करत होती.

    आणि मी करंटा, नेहेमी स्वार्थी विचार करणारा , आज सुद्धा स्वतःच्याच विवंचनेत .

    हे कुठेतरी बदलायला हवे . जीवन न

    Enjoying the preview?
    Page 1 of 1