Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

प्रासादिक मोबाईल दिवाळी २०१५ (Prasadik Diwali 2015)
प्रासादिक मोबाईल दिवाळी २०१५ (Prasadik Diwali 2015)
प्रासादिक मोबाईल दिवाळी २०१५ (Prasadik Diwali 2015)
Ebook230 pages57 minutes

प्रासादिक मोबाईल दिवाळी २०१५ (Prasadik Diwali 2015)

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

विविध आशय आणि विषयांच्या कथा, कविता, लेखांनी सजलेला आणि एकाच माणसानं लिहिलेला मराठीतला पहिला मोबाईल दिवाळी अंक!

या अंकामध्ये, एक साधी दिवाळी, भटक्याची डायरी, लघुभयकथा, पशा म्हणे, सोशल बिशल आणि असंच... सहजच... या पाच विभागांमध्ये सत्तरेक प्रकारचे लेख, कथा, कविता आहेत!!

मराठीतला हा आगळा वेगळा प्रयोग आपल्याला नक्कीच आवडेल!!

Languageमराठी
Release dateNov 7, 2015
प्रासादिक मोबाईल दिवाळी २०१५ (Prasadik Diwali 2015)
Author

Prasad Shirgaonkar

I am a writer and a poet by passion and a technologist by profession.

Related to प्रासादिक मोबाईल दिवाळी २०१५ (Prasadik Diwali 2015)

Related ebooks

Reviews for प्रासादिक मोबाईल दिवाळी २०१५ (Prasadik Diwali 2015)

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    प्रासादिक मोबाईल दिवाळी २०१५ (Prasadik Diwali 2015) - Prasad Shirgaonkar

    प्रसादिक विषयी...

    नमस्कार,

    या आगळ्या वेगळ्या दिवाळी अंकामध्ये आपलं मनापासून स्वागत!

    मराठी दिवाळी अंकाना शंभर वर्षांचा इतिहास आहे. या शंभर वर्षांमध्ये दिवाळी अंकांमध्ये अनेक बदल होत गेले. अनेक लेखक, प्रकाशकांनी अनेक वेगवेगळे प्रयोग केले. हे बदल आणि प्रयोग अंकांच्या आकार, स्वरूपापासून ते आशय-विषयापर्यंत सर्वच बाबतीत झाले. गेल्या काही वर्षांमध्ये, छापील अंकासोबत डिजिटल आणि ऑनलाईन स्वरूपातही दिवाळी अंक येत आहेत आणि वाचक त्यांना भरभरून प्रतिसाद देत आहेत.

    या प्रवासातला पुढचा टप्पा किंवा एक प्रयोग म्हणजे हा ‘मोबाईल' दिवाळी अंक! तसं पाहिलं तर दिवाळी अंकांच्या PDF फाईल तयार करून त्या मोबाईलवर पाठवणं / वाचणं हे अलिकडे सुरु झालं आहे, पण हा ई-प्रकाशनाच्या जागतिक मानकांनुसार (international standards) तयार केलेला आणि मोबाईल किंवा टॅब्लेट वरच्या सर्वसाधारण ई-बुक रीडर्समध्ये वाचता येईल असा कदाचित पहिलाच मराठी दिवाळी अंक!!

    अंकाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्णपणे एकाच लेखकानं लिहिलेला दिवाळी अंक आहे. आता माझं एकट्याचंच लेखन घेऊन मीच अंक काढणं हा उद्योग कशासाठी केला?

    उत्तर मला माहित नाही!

    १९९८ साल पासून मी मायबोली डॉट कॉम वर लिहायला लागलो. त्यापुढे अनेक वर्षं फक्त ऑनलाईनच लिहित राहिलो. कथा, कविता, गझल, लेख, भयकथा, चित्रकविता असे खूप वेगवेगळे लेखन प्रकार करत राहिलो आणि त्याला मिळणाऱ्या प्रतिसादांमधून शिकत राहिलो… गेली दोन-तीन वर्षं प्रामुख्यानं फेसबुकवर लिहित होतो, त्यातही खूप वेगवेगळे लेखन प्रयोग करत होतो. त्यात गंमत लक्षात आली की सोशल मीडियावरच्या लिखाणाचं आयुष्य हे एखाद दुसरा तास किंवा क्वचित एखादा दिवस इतकंच असतं! कितीही छान, सुंदर, वैचारिक, दार्शनिक वगैरे आपण लिहिलं आणि त्यावर कितीही सोशल इंटरॅक्शन झाली तरी ते सोशल मीडियाच्या महापुरात वाहून जातं…

    सोशल मीडियावरच्या लेखनाच्या अल्पायुष्यामुळे ही दिवाळी अंकाची कल्पना सुचली! गेल्या वर्षाभरात जे काही बरं लिहिलं आहे त्याचा एक छानसा संग्रह केला तर कदाचित तो लोकांना आवडेल असं वाटलं म्हणून हा उद्योग!

    हा अंक आणि हा प्रयोग आपल्याला आवडेल अशी आशा आहे…

    आपल्याला दिवाळीच्या आभाळभर शुभेच्छा….!

    पणती प्रासादिक दिवाळी २०१५ पणती

    प्रसादिक मोबाईल दिवाळी २०१५

    लेखक : प्रसाद शिरगांवकर | प्रकाशक : साधं सोपं डॉट कॉम

    मुखपृष्ठ : अल्पना शिरगांवकर

    वेबसाईट: www.sadha-sopa.com | फेसबुक: https://www.facebook.com/PrasadikDiwali

    ईमेल: prasad@aadii.net

    प्रसाद शिरगांवकर विषयी

    Prasad Shirgaonkar

    जन्मगांव पुणे... नोकरी / व्यवसायाच्या निमित्त युरोप, अमेरिका व इंग्लंड मध्ये प्रवास व वास्तव्य... सध्या वास्तव्य पुण्यामध्ये..

    शिक्षणाने Cost Accountant (ICWA), पण अनेक वर्षे वेगवेगळ्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये Techno-Functional व व्यवस्थापकीय कामांचा अनुभव...

    सध्या Drupal या मुक्तस्रोत तंत्रज्ञानाचं देशा-विदेशात प्रशिक्षण देण्याचं काम

    काव्य, कथा आणि ललित लेखनामध्ये विशेष रूची... गेली अनेक वर्षे विविध ऑनलाईन माध्यमांमध्ये नियमित लिखाण...

    'i-बाप' या इंटरनेट आणि मोबाईल युगातल्या एका संवेदनशील पित्याच्या 'स्टेटस अपडेट्स' च्या पुस्तकाचे लेखन

    'आनंदाचं गांव' हा स्वनिर्मित कवितांचा कार्यक्रम... 2002 पासून पुणे, मुंबई, ठाणे व लंडन येथे अनेक प्रयोग संपन्न...

    या अंकातले काही लेख, कथा, कविता वगैरे तुम्ही कदाचित फेसबुकवर वाचले असतील. काही तुम्हाला Whats App वर कधी फॉरवर्ड होऊनही आले असतील. तिथे Copy Paste करणाऱ्यांनी मूळ लेखकाचं नाव ठेवलं असेलच असं नाही. त्यामुळे काही लेख वाचताना, ‘अरे, हे तर WA वर आलं होतं, इथे कसं काय?’ असं वाटण्याची शक्यता आहे.

    म्हणूनच, या अंकातलं सर्व लिखाण ही पूर्णपणे माझी स्वतःची निर्मिती आहे, कोणतेही कॉपी-पेस्ट-फॉरवर्ड्स नाहीत हे नम्रपणे सांगावंसं वाटतं!

    पणती प्रासादिक दिवाळी २०१५ पणती

    एक साधी दिवाळी!

    पणती

    पणती प्रासादिक दिवाळी २०१५ पणती

    दसरा... दिवाळी...

    दसऱ्याला आपण सरस्वतीची आराधना करतो

    आणि दिवाळीला लक्ष्मीचं पूजन!

    आपल्या प्रायॉरीटीज काय असाव्यात हे स्पष्ट आहे...!!

    आधी सरस्वतीची आराधना... मगच लक्ष्मीची पूजा!!

    आपणा सर्वांवर सरस्वतीचा सदैव वरदहस्त राहो

    अन आपल्या आयुष्यात लक्ष्मीचा अखंड वर्षाव होत राहो

    ही मनोमन प्रार्थना!!

    पणती प्रासादिक दिवाळी २०१५ पणती

    एक साधी दिवाळी

    एक साधी दिवाळी

    तिच्या आभाळभरून आठवणी!

    लहानपणची फटाके-किल्ल्याची दिवाळी

    तरुणपणीची मित्रांच्या कल्ल्याची दिवाळी

    प्रेमात पडल्यानंतरची आतूर दिवाळी

    प्रेमभंग झाल्यानंतरची निष्ठूर दिवाळी

    लग्न ठरल्यानंतरची 'बेडा पार' दिवाळी

    लग्न झाल्यानंतरची जबाबदार दिवाळी

    अनोळखी, नव्या देशातली 'तडजोड' दिवाळी

    स्वतःच्या नव्या घरातली गोडच गोड दिवाळी

    खिशात पैसे असतानाची, अमीर दिवाळी

    खिशात पैसे नसतानाची, फकीर दिवाळी

    एक साधी दिवाळी

    तिच्या आभाळभरून आठवणी!

    तरीही प्रत्येक दिवाळी

    नवीच प्रत्येक क्षणी

    तरीही प्रत्येक दिवाळी

    हवीच प्रत्येक क्षणी!!

    पणती प्रासादिक दिवाळी २०१५ पणती

    रुचकर दिवाळी

    आई गरमा गरम चकल्या तळत असताना

    तिचं लक्ष नाहिये असं बघून

    दोन चार चकल्या लंपास करणं

    कढईत भाजत असलेल्या

    बेसनाच्या घमघमाटानं अस्वस्थ होऊन

    वळले जायच्या आधीच

    वाटीमध्ये घेऊन ‘लाडू’ फस्त करणं

    आईनी कष्टानी केलेल्या फराळाचं ताट

    शेजाऱ्यांकडे मोठ्या दु:खानी घेऊन जाणं

    त्या बदल्यात त्यांनी दिलेल्या ताटातल्या पदार्थांची

    आईसमोर समीक्षा आणि चिरफाड करणं!

    तयार केला जात असताना

    प्रत्येक पदार्थ हाणून झालेला असतानाही

    दिवाळीच्या पहिल्या पहाटेला

    शेव, चिवडा, चकल्या, कडबोळी, लाडू, अनारशांनी भरलेलं ताट

    कुतुहलानं समोर घेऊन

    त्या ताटातला प्रत्येक पदार्थ

    आपण पहिल्यांदाच चाखत आहोत

    असं मनोमन वाटून त्याची मजा घेणं

    आणि दिवाळीच्या पुढच्या आठवड्यात

    उरलेल्या, सादळलेल्या चिवड्याचेही बकाणे भरणं

    किंवा त्यात तर्री घालून त्याची मिसळ करुन हाणणं…

    मी खूप खूप प्रयत्न करतो

    पण मारवाड्याकडे मिळणाऱ्या तयार पाकिटांमधल्या

    किंवा

    ऑर्डर देऊन घरी येणाऱ्या डब्यांमधल्या

    फराळाच्या पदार्थांमधून

    यातला कुठलाच अनुभव येत नाही

    आईचे, बायकोचे आणि आपलेही कष्ट

    Outsource तर केले आपाण

    पण

    हरवून बसलो

    आपल्या हातानी आपली दिवाळी

    आपणच रुचकर करण्यातला आनंद….

    पणती प्रासादिक दिवाळी २०१५ पणती

    बापाचं हृदय

    लवंगीच्या सरींचा एक आख्खा गठ्ठा

    पूर्णपणे सुट्टा करून

    त्यातला एक एक लवंगी

    दुपारभर उडवत रहाणं

    त्यातही शक्यतो प्रत्येक लवंगी

    हातात पेटवून फेकणं

    जे शेजारी आजोबा

    वर्षभर लहान मुलांना छळतात

    त्यांच्या खिडकीपाशी रात्री बेरात्री

    सुतळी

    Enjoying the preview?
    Page 1 of 1