Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

Screen Kala Mottha Gola स्क्रीन काळा मोठ्ठा गोळा
Screen Kala Mottha Gola स्क्रीन काळा मोठ्ठा गोळा
Screen Kala Mottha Gola स्क्रीन काळा मोठ्ठा गोळा
Ebook186 pages1 hour

Screen Kala Mottha Gola स्क्रीन काळा मोठ्ठा गोळा

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

Marathi Book
Nachiket Gadre has written this book in a free flowing style. Really speaking these are not stories, but is the expression of various events that takes place in our lives from different perspectives. The author has narrated various experiences. While reading it we feel that all these experiences and events are similar to our experience. In a very few words, the author has touched the core of our heart.
मी फक्त स्वत:साठी लिहितो..

चूक..
कोणीतरी(तरी!) वाचावं म्हणूनच लिहितो..
लिखाण हा खरंतर माझा प्रांत नव्हे.. माझा व्यवसाय (धंदे??!) वेगळे आहेत..मी माझ्या उद्योगात बिझी असतो..
चूक..
काही बिझी बिझी नसतो. लिखाणासाठी पुष्कळ वेळ आणि लिखाणाची पुरेशी खाज असल्यानेच लिहितो..
चांगलं लिहिता आलं नाही तरी "खरं" लिहिणं आपल्या हातात आहेच..
ब्लोग फुकट असतो. पुस्तक विकत असतं. वाईट निघालं की नुकसान होतं.
तुम्हाला हे पुस्तक "फायद्यात" पडो अशी सदिच्छा..

Languageमराठी
Release dateNov 5, 2015
ISBN9789381659199
Screen Kala Mottha Gola स्क्रीन काळा मोठ्ठा गोळा

Related to Screen Kala Mottha Gola स्क्रीन काळा मोठ्ठा गोळा

Related ebooks

Related categories

Reviews for Screen Kala Mottha Gola स्क्रीन काळा मोठ्ठा गोळा

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    Screen Kala Mottha Gola स्क्रीन काळा मोठ्ठा गोळा - Nachiket Gadre

    screen_kala_mottha_gola_cover.jpg

    स्क्रीन काळा

    मोठ्ठा गोळा

    नचिकेत गद्रे

    ISBN- 978-81-909746-8-4

    लेखक

    नचिकेत गद्रे

    ngadre@hotmail.com

    © नचिकेत गद्रे २०१०
    प्रकाशक

    सुनिता दांडेकर

    सुकृत प्रकाशन

    ८४ शुक्रवार पेठ,

    प्रभुकृपा सोसायटी,

    पुणे - ४११००२

    दूरध्वनी: +९१ २० २४४५१५८४

    विपत्र: info@sukrutprakashan.com

    प्रथम आवृत्ती १८ डिसेंबर २०१०
    अक्षर जुळणी

    ज्योती भालेराव

    सुज्योत कॉम्पुटर

    पौड रस्ता, पुणे

    मांडणी

    सुनिता दांडेकर

    मुखपृष्ठ

    समीर दुसाने, नाशिक

    पुस्तकातील सर्व मजकूराचे हक्क सुरक्षित आहेत. त्यातील मजकूर अथवा कुठल्याही भागाचे प्रकाशकाच्या लेखी परवानगीशिवाय प्रकाशन, पुनर्निर्मिती, संगणकीय प्रणालीद्वारे जतन वा इतर कश्याही प्रकारे वापर केला जाऊ शकत नाही.

    All Rights Reserved. No part of this publication may be reproduced, stored, retrived by computer system in any forms by any means without prior written consent of publisher and licence holder.

    "प. पू. गूगलबाबा
    या माझ्या गुरूंच्या चरणी अर्पण"

    अनुक्रम

    सांडून येतो..

    जिन्यातला उभा बाबा..

    उखाड ले...!!

    आत्माराम आर्नोल्ड..

    खरं तर आजकाल..

    मिस्टर काय करतात?

    हलकट कार्टी..

    दगड..

    घट्ट नळ..

    आणि मात्र..

    एनार्चीस..

    लबड्ब लबड्ब..!!

    डाम्बिस आणि ढकलगाडी..!!

    भीतीचं इंजेक्शन..!

    बिल्ला आणि नाग..!!

    स्क्रीन काळा आणि मोठ्ठा गोळा..!!

    खारट खारट ..!!

    विक्टर माईक सिएरा.. सेलम..!!

    मी ?? म्हातारा?

    बेस्ट आंबेमोहोर नं. १ ..

    थारे..! थारे..!! थारे..!!!

    स्वादभरा निरमा श्रीखंड..!!

    रेडियमची कवटी..

    अनुप्रस्थ महासंयोजी पिंड..!!

    ठाणे ते छ. शि. ट..!!

    भळ्ळकन..!!!

    एकमत..

    आयन मर्क्युरी वोर्टेक्स.. बाप रे..!!

    बी.पी.ओ.

    सांडून येतो..

    मला यत्ता चौथी पर्यंत हिंदी यायचं नाही..

    शाळेत विषयच नव्हता..

    यायचं नाही म्हणजे नाही...अजाबात नाय...

    म्हणून जे काही दिसेल ते मराठीतच समजून घ्यायचं..

    मुकद्दर का सिकंदर हा सिनेमा..

    आम्ही चाळकरी पोरं मुकंदर का सिकंदर असं म्हणायचो..

    आणि त्याचा अर्थ आमच्या दृष्टीनं लिटरली मराठी होता: मुकंदर ? ...का सिकंदर? म्हणजे चहा की कॉफी? ..

    मुकंदर ऑर सिकंदर ?.. मेक युअर चॉईस...

    कुर्बानी पिच्चर मध्ये आप जैसा कोई हे मस्त डिस्को गाणं आलं..

    मूळ अर्थ कळत नसल्यानं जे ऐकू येईल ते खरं..

    आप जैसा कोई मेरी जिंदगी में आये..तो बाप बन जाये..

    सीरीयसली असंच वाटायचं..जोक करायचा म्हणून नव्हे..

    मग थोड्या दिवसांनी..

    आप जैसा कोई मेरी जिंदगी में आये..तो वापस जाये..

    असं...

    तोहफा तोहफा..लाया लाया..असं गाणं सुपरहिट्ट एकदम..

    मला त्यात (शिवाजी महाराजांची असते तशी) तोफ हा शब्द दिसून मनापासून कोणीतरी युद्धासाठी तोफा घेऊन आलाय आणि तसं गाऊन श्रीदेवीला सांगतोय असं वाटायचं..

    तोफा तोफा लाया लाया.. काय चूक आहे त्यात?

    पाण्याच्या टाकी विषयी माहिती देणारं टाकी ओ टाकी ओ टाकी टाकी टाकी रे.. असंही एक सुंदर गीत होतं..

    प्यार करनेवाले प्यार करते है 'शाम' से.. असंही ढिंगचॅक गाणं माझं लाडकं..

    'शान'से हे नंतर कळलं..

    पण संध्याकाळपासूनच चौपाटीवर जागा पकडून बसलेली गुटर्गू मंडळी बघून हा माझा अजाण वयातला अर्थही आता बरोबरच वाटतो..

    माझा चाळीतला चाळूसोबती मला सिनेमाची स्टोरी सांगत होता..

    ....अरे तो प्रेम चोप्रा ना मीनाक्षी शेषाद्रीवर बलात्कार करतो..

    म्हणजे काय करतो नक्की ? मी ज्ञानलालासेनं विचारता झालो..

    तो थोडा विचारात पडला..

    मग ...अरे बलात्कार..म्हणजे हिकडे तिकडे हातबीत लावून सतावतो तिला तो..

    हलकेच मला समजावत तो वदला..

    दोघेही तिसरीत होतो..असो..

    मराठी, संस्कृत वगैरे मध्येही ऐकून अर्थ लावण्याची बोंबच होती..

    सा विद्या या विमुक्तये हे शाळेचं बोधवाक्य मला चावी द्याया विमुक्तये असं ऐकू यायचं..

    अर्थ नाहीच कळायचा..पण चावी किंवा किल्लीशी संबंधित..चावी द्यायला हवी आहे..किंवा तत्सम काहीतरी वाटायचं..

    सदाचार हा थोर सांडू नये तो हे मला सदाचार हा थोर सांडून येतो असं ऐकू यायचं..म्हणजे मी जरा जाऊन सदाचार सांडतो आणि येतोच परत लगेच..

    आज ये अंगणा पाहुणा गोजिरा.. अशी कविता होती..

    त्यात श्रावणी न्हातसे..अश्विनी गातसे.. अशी ओळ होती..

    मला आमच्या वर्गातल्या त्याच नावाच्या मुली अनुक्रमे नहात आणि गाणं गात आहेत असं डोळ्यांसमोर यायचं..

    आली आली सर ही ओली.. हे गाणं ऐकलं की आमच्या रत्नागिरीच्या धुवांधार पावसात भिजून ओले झालेले साळवी सर (सर्वात कडक्क सर..!!) वर्गाच्या दारात आलेत असं वाटायचं..

    गंजका खिळा,पत्रा वगैरे लागला की धनुर्वात होतो असं ऐकलेलं..आम्ही एकमेकांना सांगायचो..अरे पत्रा लागलाय ना तुला..आता तुला धनुर्विद्या होणार.. की बिचारा कापलेला पोरगा गळफटायाचा..

    नगरपालिकेच्या व्यायामशाळेत दर शनिवारी शेंदूर लावून आम्ही सगळे हनुमान स्तोत्र म्हणायचो..

    तालीम मास्तर खड्या आवाजात भीमरूपी महारुद्रा सुरु करायचे..

    खोब-याच्या आशेनं आम्ही उभे असायचो..

    त्यात एका ठिकाणी हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी.. अशी ओळ यायची..

    मला एकदम वाटायचं की श्लोक संपले आणि मास्तर काहीतरी हे धर म्हणून सांगताहेत..म्हणून एकदा मी धरायला पुढेही झालो होतो..

    पुढे हायस्कूल सुरु झालं..बरंच काही नीट समजायला लागलं..जमिनीवर टाकून बसायची बस्करं गेली आणि लाकडी बेंच आली..

    मग चुपचाप समोरच्या डेस्कात कर्कटकानं खोदखोदून आरपार भोकं पाडण्याची वर्षं सुरु झाली..

    मज्जा..!!

    ~*~

    जिन्यातला उभा बाबा..

    बघता बघता पोर पहिल्या दिवशी शाळेत गेलं. म्हणजे घालवलं. स्वत:हून कसलं जातंय?

    शाळेच्या जिन्यापर्यंत त्यानं अवसान गळ्यामध्ये घट्ट धरून ठेवलं होतं. पण तिथल्या वॉचमननं विनावॉर्निंग त्याला खस्सकन पकडलं तेव्हा पोर खूप घाबरलं. जन्मल्यास इतके दिवस ते आमच्याखेरीज अनोळखी कोणाकडेच राहिलेलं नाही.

    ते रडत धडपडत होतं. त्याला आत घेउन गेले तेव्हा मला खूप गोष्टी समजल्या. जाणवल्या. नव्यानं कळल्या.

    एक. मी बाबा होतो आणि तो माझा मुलगा. पण तीस वर्षांनी मोठा असूनही मी आणि तो यांची मनस्थिती अगदी अगदी एकच होती.

    मी रडू दाबायला आणि न झगडायला तीस वर्षांत शिकलो होतो. त्याला ते अजून नीट येत नव्हतं.

    दोन..मी नुकताच माझ्या शाळेत जाताना रडलो असं वाटेपर्यंत आता माझा मुलगा त्याच्या शाळेत जाताना रडतोय. आणि तो शाळेत जाताना मीही रडतोय. रडणं संपलं असं वाटलं होतं पण ते चालूच आहे.

    तीन...मी मोठ्ठा झालोय. वय वाढलंय. अर्धा ग्लास संपलाय. अर्धा भरलाय की अर्धा रिकामा या विचारात हेच विसरलोय की मीच अर्धा पिऊन पिऊन संपवलाय.

    चार.... पोरगा माझ्याशिवाय राहिला नाहीये कोणाजवळ. आणि मी ही राहिलो नाहीय्ये पोराशिवाय कोणाजवळ तो आल्यापासून..

    पाच..... जीव लागणं, जिवाला लागणं, गलबलणं या सगळ्या गोष्टी बाईला किंवा आईला किंवा बापाला किंवा पुरुषाला वगैरे होत नसून आतमध्ये एक जगता जीव असतो त्याला होतात.

    सहा......आजपासून माझं पोरगं वेळेत अडकलं. आता नोकरी, धंदा जे काय करेल त्यातून रिटायर होईपर्यंत काळ ही डायमेन्शन त्याला घट्ट चिकटली.

    आई बाबांशिवाय शाळेत जाणार नाही पासून आई बाबा शाळेत नकोत बुवा पर्यंत काळ हळूहळू सरकेल. तोपर्यंत माझं अवघड आहे खरंच.

    दोन तासांनी नर्सरी

    Enjoying the preview?
    Page 1 of 1