Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

Shodh Anantacha शोध अनंताचा
Shodh Anantacha शोध अनंताचा
Shodh Anantacha शोध अनंताचा
Ebook226 pages1 hour

Shodh Anantacha शोध अनंताचा

Rating: 3.5 out of 5 stars

3.5/5

()

Read preview

About this ebook

एडिंग्टन एक सुंदर प्रश्‍न विज्ञानालाच विचारतो. ‘‘जी-जी गोष्ट मानवी अनुभवांच्या, गरजांच्या दृष्टीने आवश्यक आहे त्या प्रत्येक गोष्टीचे उत्तर विज्ञानाच्या मोजपट्टीने देता आलेच पाहिजे असे का समजावे? मी तर म्हणेन की, दैनंदिन जीवनाच्या धकाधकीने वैतागून आपण स्वत:लाच ओरडून विचारतो, ‘हे सारं कशासाठी?’
तर आतून आकांत उठेल की, हे सारे त्या आत्म्यासाठी आहे

Languageमराठी
Release dateMay 25, 2016
ISBN9789381659229
Shodh Anantacha शोध अनंताचा
Author

Dr. G. N. Natu

डॉ. गोपाळ नारायण नातू जन्म- नोव्हेंबर १९४३ शिक्षण - M.Sc.Ph.D., पुणे विद्यापीठ उत्तम प्रबंधासाठी ‘वाटुमल फाऊंडेशन’ या ब्रिटिश संस्थेकडून पुरस्कार पोस्ट डॉक्टरल फेलो म्हणून जपान येथील नागोया विद्यापीठात संशोधन (१९७८-७९) संशोधनाचा विषय – Development of Molecular Stereochemistay of cancer inhibitting drug molecules. अतिथी शास्त्रज्ञ म्हणून १९८४-८५ या वर्षी पुन्हा नागोया विद्यापीठ जपान येथून निमंत्रण. संशोधनाचा विषय – X-Ray, ESCA, N15 NMR of coordination compounds of catalic importance कार्यक्षेत्र – पुणे विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागात प्रपाठक (१९६८ ते १९९४) आठ विद्यार्थ्यांना पी.एचडी. साठी तसेच बारा विद्यार्थ्यांना एम.फिल.साठी मार्गदर्शन केले. निवृत्तीनंतर- Message of Brihadaranyaka Upanishad- By Sw. Ranganathanand या ग्रंथाचा मराठी अनुवाद ‘जीवन-विकास’ रामकृष्ण मठ, नागपूर या मासिकातून धर्म, तत्त्वज्ञान व आधुनिक विज्ञान या विषयांवर सुमारे पंचवीस लेख. ज्ञानेश्वरीतील वैज्ञानिक प्रतिमा व विज्ञानोपनिषदातील महर्षी या विषयांवर लेखमाला. इतरत्रही विज्ञान व धर्म यांवर लेख तसेच अनेक ठिकाणी व्याख्याने . रामकृष्ण मठ, पुणे येथे शैक्षणिक व साहित्यिक सेवा (१९९४ ते २०१२ )

Related to Shodh Anantacha शोध अनंताचा

Related ebooks

Reviews for Shodh Anantacha शोध अनंताचा

Rating: 3.5 out of 5 stars
3.5/5

2 ratings1 review

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

  • Rating: 5 out of 5 stars
    5/5
    Great contribution in the Marathi literature. मराठीतून सादर केलेले हे पुस्तक ज्ञान सागर आहे.

Book preview

Shodh Anantacha शोध अनंताचा - Dr. G. N. Natu

अर्पण

ज्यांच्या साहित्याच्या वाचनामुळे अध्यात्म व विज्ञान यांच्यातील सौहार्द मला दिसू लागले, त्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउली यांच्या चरणी ......

भूमिका

विज्ञानाचे अभ्यासक ज्या वेळी अध्यात्मावर बोलू लागतात, त्या वेळी बऱ्याच उलटसुलट प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळतात. ‘अरे हे विज्ञानवादी लोक उपनिषदे आणि वेद यांत कशाला अडकले?’ किंवा दुसरे टोक म्हणजे ‘अरे हे काय आता विज्ञानाच्या साहाय्याने ईश्वराला सिद्ध करणार की काय? कोण समजतात कुणास ठाऊक स्वत:ला?’ या दोन्ही गटांतल्या लोकांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की, हे पुस्तक लिहिण्यामागे तसा कोणताही हेतू नाही. कारण जो स्वयंसिद्ध आहे त्याला कोण कशाला सिद्ध करायला धजावेल? सनातन सत्याला कुणाच्या अनुमोदनाची आवश्यकताच नसते; परंतु या वैज्ञानिकांच्या अभ्यासातून एक आनंदाची गोष्ट उलगडत गेली. ती म्हणजे भारतीय दार्शनिकांना त्यांच्या हजारो वर्षांच्या सखोल चिंतनातून जी वाट प्रकाशमान झाली, त्याच वाटेच्या जवळपास हे वैज्ञानिक त्यांच्या त्यांच्या विषयाच्या सखोल चिंतनातून येऊन ठेपले आहेत.

हा आनंद आजच्या विज्ञानयुगात वावरणाऱ्या तरुण मंडळींना देता यावा, एवढाच या पुस्तकामागचा हेतू आहे. विज्ञानाच्या भाषेतून आणि वैज्ञानिकांच्या शब्दांतून ही भावना त्यांच्यापर्यंत चटकन पोचेल आणि या वैज्ञानिकांचे हे चिंतनात्मक विचार त्यांना भावतील अशी आशा आहे.

- डॉ. गो. ना. नातू

ऋणनिर्देश

हे पुस्तक साकार होताना मदतीसाठी जे हात पुढे झाले, त्यांच्याविषयीची माझी ऋणभावना या ठिकाणी व्यक्त करण्याची सानंद संधी मी घेत आहे.

या पुस्तकाला प्रस्तावना देण्यासाठी विज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही विषयांतील तज्ज्ञ आणि व्यासंगी व्यक्तिमत्त्वाची आवश्यकता होती. प्रथमपासूनच यासाठी डॉ. गिरीश बापट, संचालक, ज्ञानप्रबोधिनी, पुणे, यांचे नाव मनात घोळत होते. या संदर्भात त्यांच्याशी बोलताच त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता चटकन होकार दिला. त्यांच्या अत्यंत व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून आशयास समर्पक अशी प्रस्तावना दिली. त्यांनी या प्रस्तावनेत विज्ञान आणि तत्त्वज्ञानाची सीमारेषा स्पष्टपणे उलगडून दाखवली आहे. त्यांच्या या अमोल सहकार्याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी आहे.

या विषयाच्या लेखनप्रांतात माझा जो प्रवेश झाला तो स्वामी योगात्मानंद , वेदान्त सोसायटी, प्रॉव्हिडन्स, USA, यांच्या आग्रहामुळे ! साधारण १९९२ च्या सुमारास ‘जीवन-विकास’ रामकृष्ण मठ, नागपूर, या मासिकासाठी विज्ञान- तत्त्वज्ञान या विषयावरील माझ्या लेखांचा प्रवेश झाला. त्या काळात स्वामी योगात्मानंद या मासिकाचे संपादक होते. त्यांनीच माझ्याकडून हे लेख लिहवून घेतले. या अभ्यासाला त्यांनीच प्रेरणा दिली. या ठिकाणी त्यांचे मी अंतःकरणापासून आभार मानतो.

पुस्तकाचा विषय गंभीर आहे तरी त्याच्या प्रकाशनाची तयारी सुकृत प्रकाशनाच्या सौ. सुनीता दांडेकर यांनी दाखवल्याबद्दल त्यांचे मी विशेष आभार मानतो. अगदी मनापासून त्यांनी या पुस्तकाच्या कामात लक्ष घालून हे कार्य पूर्णत्वास नेले आहे.

अगदी थोड्या वेळात वेगळ्या विषयावरील या पुस्तकाचे मुखपृष्ठ अतिशय सुयोग्य आणि आकर्षक केल्याबद्दल कलाकार श्री. धीरज नवलाखे यांना मी मन:पूर्वक धन्यवाद देतो.

आमच्या स्नेही आणि शुभचिंतक कु. गायत्री सेवक या नेहमीच निरपेक्ष साहाय्य करण्यास तत्पर असतात. त्यांचे उत्स्फूर्त प्रोत्साहन आणि मदत यांमुळे हे पुस्तक मूर्त स्वरूपात येऊ शकले. त्यांनीच सौ. सुनीता दांडेकर यांची भेट घडवली. त्यांचे आभार मानलेले त्यांना आवडणार नसले तरी मी त्यांचा मनापासून ऋणी आहे.

जिच्या पाठपुराव्यामुळे मी हा प्रकल्प करण्यास प्रवृत्त झालो, ती माझी पत्नी सौ. जयश्री हिला विशेष श्रेय दिले पाहिजे. या पुस्तकाच्या क्लिष्ट विषयाची भाषा सुगम करण्याची अवघड कामगिरी तिने पार पडली आहे.

याखेरीज माझ्या ज्या अनेक सुहृदांनी आणि मित्रांनी मला वेळोवेळी या लेखनास प्रोत्साहन दिले, त्या सर्वांचे मी येथे आभार मानतो.

डॉ. गो. ना. नातू

लेखक परिचय

डॉ. गोपाळ नारायण नातू

जन्म- नोव्हेंबर १९४३

शिक्षण - M.Sc.Ph.D., पुणे विद्यापीठ

उत्तम प्रबंधासाठी ‘वाटुमल फाऊंडेशन’ या ब्रिटिश संस्थेकडून पुरस्कार

पोस्ट डॉक्टरल फेलो म्हणून जपान येथील नागोया विद्यापीठात संशोधन (१९७८-७९)

संशोधनाचा विषय – Development of Molecular Stereochemistay of cancer inhibitting drug molecules.

अतिथी शास्त्रज्ञ म्हणून १९८४-८५ या वर्षी पुन्हा नागोया विद्यापीठ जपान येथून निमंत्रण.

संशोधनाचा विषय – X-Ray, ESCA, N15 NMR of coordination compounds of catalic importance

कार्यक्षेत्र – पुणे विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागात प्रपाठक (१९६८ ते १९९४)

आठ विद्यार्थ्यांना पी.एचडी. साठी तसेच बारा विद्यार्थ्यांना एम.फिल.साठी मार्गदर्शन केले.

निवृत्तीनंतर-

Message of Brihadaranyaka Upanishad- By Sw. Ranganathanand या ग्रंथाचा मराठी अनुवाद

‘जीवन-विकास’ रामकृष्ण मठ, नागपूर या मासिकातून धर्म, तत्त्वज्ञान व आधुनिक विज्ञान या विषयांवर सुमारे पंचवीस लेख.

ज्ञानेश्वरीतील वैज्ञानिक प्रतिमा व विज्ञानोपनिषदातील महर्षी या विषयांवर लेखमाला.

इतरत्रही विज्ञान व धर्म यांवर लेख तसेच अनेक ठिकाणी व्याख्याने .

रामकृष्ण मठ, पुणे येथे शैक्षणिक व साहित्यिक सेवा (१९९४ ते २०१२ )

प्रस्तावना

वैज्ञानिक पद्धतीतील स्थित्यंतरे

विश्वाच्या मूळशक्तीविषयी विज्ञानाची विचारसाधना आणि अध्यात्माची परमार्थ साधना या मूळशक्तीचा शोध घेणाऱ्या दोन पद्धतींविषयी, आणि या दोन्ही पद्धतींचा वापर करून व्यक्तीने व समाजाने कसे वागावे याबद्दल होणारे दिशा-दिग्दर्शन यासंबंधी, आठ वैज्ञानिकांनी मांडलेल्या विचारांचे उत्तम संकलन डॉ. गो. ना. नातू यांनी या पुस्तकामध्ये केले आहे.

आठ वैज्ञानिकांपैकी मॅक्स प्लँक, सर जेम्स जीन्स आणि अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे विचार सविस्तर घेतले आहेत, तर इतर पाच जणांचे विचार थोडक्यात घेतले आहेत. सर्व जणांची मुख्य वैज्ञानिक कारकीर्द विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात पूर्ण झालेली आहे. त्यांनी जे संशोधन केले त्याच्या पायावर नंतरच्या ६० -६५ वर्षांत विज्ञानाची बरीच प्रगती झाली आहे. आधीची वैज्ञानिक पद्धती ही केवळ प्रयोगातून किंवा निरीक्षणांतून सापडलेल्या तथ्यांचा विचार करणारी होती. बऱ्याच वेळा बरेच लोक भौतिक विज्ञान म्हणजेच विज्ञान अशी समजूत करून घेतात. ते विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा भौतिक जगाच्या नियमांनाच महत्त्व देतात. कुतूहलाने सृष्टीतील सर्व गोष्टींचे व घडामोडींचे निरीक्षण करणे, नंतर त्या निरीक्षणांतून आधी काय व नंतर काय? कशामुळे काय घडते? अशा संबंधांचे नियम शोधणे, या नियमांच्या आधारे काय घडू शकेल याची भाकिते करणे, ती भाकिते तपासणे आणि आवश्यकतेप्रमाणे निरीक्षणे किंवा नियमांमध्ये अधिक अचूकता आणणे किंवा नवीन निरीक्षणे करणे ही अभ्यासाची पद्धत म्हणजे विज्ञानाची पद्धत असे थोडक्यात म्हणता येईल.

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील विज्ञान आणि अध्यात्म यांच्यामधील संवादाची पातळी आणि एकविसाव्या शतकातील या दोन्हीतील संवादाची पातळी वेगवेगळी असणार हे लक्षात ठेवून हे पुस्तक वाचले पाहिजे.

विश्वाच्या रचनेसंबंधी आणि विश्वातील घडामोडींसंबंधी वैज्ञानिकांना पडणारे प्रश्न ते आपल्या बुद्धीच्या साहाय्याने सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. आज एखादा प्रश्न सुटत नसेल तर तो अपुऱ्या माहितीमुळे, माहिती मिळवण्यासाठी पुरेशी सक्षम साधने आज उपलब्ध नसल्यामुळे, किंवा उपलब्ध माहितीचे विश्लेषण करण्याची योग्य तंत्रे अजून सापडली नसल्यामुळे सोडवता येत नाही, परंतु भविष्यकाळात योग्य ती साधने, माहिती व तंत्रे उपलब्ध होतील व प्रश्नाचे उत्तर मिळेल अशी त्यांची श्रद्धा असते.

या पुस्तकात ज्या आठ वैज्ञानिकांचे विश्वरचनेसंबंधीचे विचार संग्रहित केले आहेत त्या सर्व जणांची अशीच श्रद्धा होती. ते ज्ञातअज्ञात विश्वाच्या सीमारेषेवर संशोधन करत होते. बुद्धीच्या साहाय्याने भौतिक सत्याचे नवीन नवीन पैलू कळत जातात. परंतु इच्छाशक्ती, कर्तव्यपरायणता, आनंदाची अनुभूती, नैतिकता, सौंदर्यदृष्टी, काव्य, उत्स्फूर्तता, धर्मभावना इत्यादी मानवी विचारविश्वातील किंवा अनुभवविश्वातील अनेक गोष्टींना वैज्ञानिक पद्धतीने स्पर्श करता येत नाही, असेही वेगवेगळ्या निमित्तांनी या सर्व वैज्ञानिकांना लक्षात येत गेले.

वैज्ञानिकांनाही श्रद्धा आवश्यक

या विश्वातील अंतिम व संपूर्ण सत्य कधी ना कधी बुद्धीच्या साहाय्याने समजून घेता येईल ही वैज्ञानिकांची श्रद्धा असते. या विश्वातील अंतिम व संपूर्ण सत्य कधी ना कधी प्रत्यक्ष अनुभवता येईल अशी आध्यात्मिक व्यक्तीची श्रद्धा असते. अशा व्यक्तींपैकी काही व्यक्ती आपल्या अनुभवांचे बुद्धीच्या साहाय्याने विश्लेषण करायचा प्रयत्न करतात आणि त्यातून तेदेखील अध्यात्माचे शास्त्र उलगडण्याचा प्रयत्न करतात. भारतामध्ये उपनिषदांच्या काळी सर्व अनुभवांचे आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक असे वर्गीकरण करायची पद्धत होती. आध्यात्मिक म्हणजे स्वतःच्या देहाशी संबंधित असे अनुभव. आधिभौतिक म्हणजे स्वतःच्या देहापलीकडील, सर्व चराचर सृष्टीतील, ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने समजणारे आणि मन-बुद्धीच्या साहाय्याने ज्यांचा कार्यकारण भाव लक्षात येतो असे अनुभव आणि आधिदैविक म्हणजे इंद्रियांच्या साहाय्याने ज्यांचे फक्त अंतिम कार्य किंवा परिणाम समजतो परंतु मन-बुद्धीच्या साहाय्याने ज्यांची कार्यकारण परंपरा समजू शकत नाही असे अनुभव. अशा कार्यकारण परंपरेतील त्या-त्या वेळी मूळ वाटलेल्या कारणाला एकेक देवता मानले गेले आणि ह्या देवता सर्व घटना घडवतात असे मानले गेले. विज्ञानाची जशी प्रगती होत गेली तसे बरेच आधिदैविक अनुभव आधिभौतिक कारणांमुळेच घडतात असे लक्षात येत गेले. आज एकविसाव्या शतकात आधिभौतिक अनुभवांचे क्षेत्र बरेच व्यापक झाले आहे. या पुस्तकात उल्लेख केलेले आठही वैज्ञानिक आधिदैविक क्षेत्र मनात नाहीत. परंतु देहरचना आणि मनाचे कार्य यांच्याबद्दल कितीही तपशिलात ज्ञान असले तरी देहामध्ये एक ‘अहम्’ नावाचे केंद्र आहे असे हे आठही वैज्ञानिक मानताना दिसतात.

भारतीय परंपरेनुसार आणि आधुनिक विज्ञानाच्या परंपरेनुसार आज अनिर्णित असलेला एक मुख्य मुद्दा आहे: जड सृष्टीतून

Enjoying the preview?
Page 1 of 1