Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

ऐकण्याची कला
ऐकण्याची कला
ऐकण्याची कला
Ebook343 pages2 hours

ऐकण्याची कला

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

डॅग हेवर्ड -मिल्स अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यामध्ये “निष्ठा आणि अनिष्ठा” या विक्रमी विक्री होत असलेल्या पुस्तकाचा समावेश आहे. द लाइटहाउस चॅपल इंटरनॅशनल नावाच्या दोन हजार मंडळ्यांचे ते संस्थापक आहेत.

Languageमराठी
Release dateJun 20, 2018
ISBN9781641354363
ऐकण्याची कला
Author

Dag Heward-Mills

Bishop Dag Heward-Mills is a medical doctor by profession and the founder of the United Denominations Originating from the Lighthouse Group of Churches (UD-OLGC). The UD-OLGC comprises over three thousand churches pastored by seasoned ministers, groomed and trained in-house. Bishop Dag Heward-Mills oversees this charismatic group of denominations, which operates in over 90 different countries in Africa, Asia, Europe, the Caribbean, Australia, and North and South America. With a ministry spanning over thirty years, Dag Heward-Mills has authored several books with bestsellers including ‘The Art of Leadership’, ‘Loyalty and Disloyalty’, and ‘The Mega Church’. He is considered to be the largest publishing author in Africa, having had his books translated into over 52 languages with more than 40 million copies in print.

Related to ऐकण्याची कला

Related ebooks

Reviews for ऐकण्याची कला

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    ऐकण्याची कला - Dag Heward-Mills

    ... देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे.

    रोम. १२:२

    देवाच्या इच्छेचे परिपूर्ण किंवा अपरिपूर्ण असे वर्णन करता येईल. देवाच्या अपरिपूर्ण इच्छेला अपरिपूर्ण म्हटले जाते कारण देवाच्या खऱ्या इच्छेचे प्रतिरूप त्यात आहे परंतु ही ती इच्छा नाही जी देवाला हवी आहे.

    देवाची परिपूर्ण इच्छा ही पूर्ण, परिपक्व आणि देवाची संपूर्ण इच्छा आहे. देवाची अपरिपूर्ण इच्छा ही आहे की तो लोकांना एखादी गोष्ट करू देतो, तथापि ही त्यांच्यासाठी असलेली त्याची प्रथम इच्छा नसते.

    देवाची परिपूर्ण इच्छा

    1.देवाची परिपूर्ण इच्छा अशी जागा आहे जिथे तुम्ही असावे अशी देवाची खरोखर इच्छा आहे. जेव्हा तुम्ही देवाच्या परिपूर्ण इच्छेत असता तेव्हा देव तुमच्यावर प्रसन्न होतो आणि जेव्हा तुमच्या नावाचा उल्लेख होतो तेव्हा तो उत्तेजित होतो.

    2.देवाच्या परिपूर्ण इच्छेत तुम्ही उत्कृष्ट स्थानी असता, परमेश्वराच्या मूळ योजनेत अगदी व्यवस्थित बसले जाता.

    3.देवाच्या परिपूर्ण इच्छेमध्ये, तुम्ही पूर्णपणे त्या आवश्यकता पूर्ण करता ज्यासाठी तुम्हांला देवाने निर्माण केले आहे.

    देवाची परिपूर्ण इच्छा

    1.देव त्याच्या मुलांना अपरिपूर्ण इच्छेत जाऊ देतो कारण त्यांच्यासाठी असलेल्या त्याच्या मूळ आणि परिपूर्ण योजने विरुद्ध ते बंड पुकारतात आणि तिचा नकार करतात.

    2.जेव्हा तुम्ही देवाच्या अपरिपूर्ण इच्छेमध्ये असता, तेव्हा देव तुमच्यावर खरोखरच प्रसन्न नसतो. तो फक्त तुमच्यावर उपकार करून तुम्हांला पश्चात्ताप करण्यास वेळ देतो.

    3.देवाच्या अपरिपूर्ण इच्छेमध्ये तुम्हाला कदाचित देवाची कृपा तुमच्यावर आहे असे वाटते परंतु तुम्ही देवाच्या प्रति असलेल्या तुमच्या सेवेत अपुरे असून तुमच्या जीवनाकरिता असलेल्या देवाच्या मूळ उद्देशाला पूर्ण करीत नाही.

    4.देवाची अपरिपूर्ण इच्छा ही अशी जागा आहे जिथे तुम्ही अनुचितपणे ठेवले जाता आणि तसेच तुम्ही तुमच्या कामासाठी पात्र नसता.

    देवाच्या परिपूर्ण इच्छेकडून अपरिपूर्णइच्छेकडे जाणे

    संपूर्ण पवित्रशास्त्रात, तुम्हांला देवाची अशी उदाहरणे आढळतील, जेथे त्याने लोकांना त्यांना हवे ते करू देण्याची अनुमती दिली, तथापि ती त्याची इच्छा नव्हती. बहुतेक वेळा, देवाच्या लोकांनी देवाच्या परिपूर्ण इच्छेविरूद्ध बंड केले आणि ते द्वेषाने भरले. तत्काळ न्यायाचा दंड देण्याऐवजी, देव त्याच्या लोकांना त्याच्या अपरिपूर्ण (अनुचित, अयोग्य, अस्वीकार्य, आदर्शरहित) इच्छेत राहण्यास अनुमती देत असे, आणि मग ते त्यांच्या बंडखोरीसाठी उचित व जोरदार ताडन स्वीकारत.

    या पुस्तकात, तुम्हाला हे दिसून येईल की देव लोकांना कशा प्रकारे राजा असण्यासाठी परवानगी देतो परंतु त्यांना शिक्षा देण्यासाठी राजांचा उपयोग करतो. तो लोकांना समृद्धी असण्याची मुभा देतो पण नंतर त्यांच्या आत्म्यांमध्ये भ्रम आणि कृशता पाठवतो. तो लोकांना मूर्त्या तयार करू देतो आणि नंतर त्यांचा नाश करतो.

    तो एका संदेष्ट्याला एका मिशन वर जाऊ देतो, पण नंतर त्याचा निषेध करण्यासाठी एका गाढवीला पाठवतो.

    देव लोकांना त्याच्या अपरिपूर्ण इच्छेत जाऊ देऊन स्वतःचे खंडन करत नाही. तो त्याचा त्याने त्याच्या परिपूर्ण इच्छेच्या प्रति केलेलं बंड, हट्टीपणा आणि नकार याचा प्रतिसाद आहे. सरतेशेवटी, सर्व माणसांना उचित, योग्य तयार केलेला आणि प्रगत दंड प्राप्त होतो!

    काही लोक देवाच्या या अपरिपूर्ण इच्छेला देवाची अनुमोदक इच्छा म्हणतात. देवाची अपरिपूर्ण इच्छा अशी जागा आहे जिथे सुवार्तेचे अनेक सेवक कार्य करतात. काही लोक देवाच्या या अपरिपूर्ण इच्छेत संपूर्ण आयुष्य जगतात.

    देवाच्या अपरिपूर्ण इच्छेत लोकांच्या बाबतीत सर्व काही ठीक असल्याचे दिसून येते. त्यांच्या सेवाकार्याची भरभराट होते आणि देवाची कृपा त्यांच्या प्रत्येक कृतीवर असल्याचे दिसून येते. परंतु विपुल आणि उघड यशाचा अर्थ असा होत नाही की देव त्यांच्यावर प्रसन्न आहे.

    आपल्यापैकी बहुतांश लोक ही वरकरणी कृपा आणि ज्याला लोक आशीर्वाद म्हणतात त्याद्वारे फसवले जातात.

    पैसे आणि विपुलता असणे हे देव तुमच्यावर प्रसन्न असल्याचे कधीही दर्शक राहिलेले नाही. सैतान देखील त्याची सेवा करणाऱ्याला पैसे देतो. सैतानाने येशूला सांगितले होते की तू मला नमन कर म्हणजे मी तुला संपूर्ण जग देईल.

    देवाचे सानिध्य आणि पवित्र आत्म्याची वाणी याचा तुम्ही शोध केला पाहिजे पैशाचा किंवा इतर भौतिक गोष्टींचा नाही.

    जेव्हा तुम्ही एखाद्या सेवकाच्या संपर्कात येता तेव्हा तुम्ही त्याच्यासोबत परमेश्वराची उपस्थिति आहे की नाही हे बघितले पाहिजे. पवित्र आत्म्याची वाणी आणि प्रभूचे वचन आहे का हे बघणे अगत्याचे आहे.

    देवाचे लोक देवाच्या परिपूर्ण इच्छेकडून देवाच्या अपरिपूर्ण इच्छेकडे जात असलेल्या उदाहरणांनी पवित्र शास्त्र भरलेले आहे. देवाच्या अपरिपूर्ण इच्छेत असलेल्या लोकांना देव आशीर्वादित करत आहे असे दिसून येते परंतु तो त्यांच्याशी खरोखरच प्रसन्न नाही.

    चला, आपण देवाच्या अपरिपूर्ण इच्छेकडे वळलेल्या लोकांची काही उदाहरणे पाहूया.

    १. इस्राएल लोकांनी राजा हवा आहे असा हट्ट करून देवाच्या अपरिपूर्णतेत प्रवेश केला.

    एक राजा असणे ही इस्राएल लोकांसाठी असलेली देवाची परिपूर्ण, परिपक्व इच्छा नव्हती. परंतु, देवाने ती मान्य केली आणि शमुवेलाला एकांतात सांगितले की लोकांनी त्याला नाकारले होते.

    राजा असणे ही देवाच्या परिपूर्ण इच्छा नव्हती आणि तरीही देवाने असे होऊ दिले. तुम्हांला हे दिसूनच येईल की, या व्यवस्थेमुळे चांगले परिणाम होऊ शकले नाहीत आणि इस्राएल लोकांना त्यांच्या राजांकडून खूप त्रास सहन करावा लागला.

    देव काही गोष्टींना वरकरणी परवानगी देतो तेव्हा फसवले न जाणे हे महत्त्वाचे आहे. परमेश्वराचे खरे हृदय त्यांच्यासाठी उघडले जाते जे त्याच्या खरोखर निकट असतात.

    आम्ही सर्व वेळ असे करतो, जेव्हा आपण सर्वांमध्ये असतो तेव्हा राजकीयदृष्ट्या योग्य असल्याचे म्हणतो आणि इतरत्र कुठेही आपले खरे अंतःकरण प्रकट करतो. तुम्ही एखाद्या गोष्टीसंबंधी देवाचे खरे मन आणि खरे हृदय शोधायला शिकले पाहिजे.

    शमुवेलाला राजा नेमण्याची अनुमती दिली तेव्हा परमेश्वर दु:खी झाला होता. त्याला माहीत होते लोकांनी त्याला नाकारले होते. त्याला माहीत होते की त्याला नाकारण्यासाठी लोक फक्त शमुवेलाच्या पुत्रांना एक निमित्त म्हणून वापरत होते. परमेश्वराने त्यांच्या विनंतीस सहमती दर्शवली परंतु हे सर्व इस्राएल लोकांसाठी चांगले ठरणार नव्हते. देव जेव्हा तुमच्या जीवनात काही गोष्टी घडू देत आहे असे दिसून येते तेव्हा सतर्क राहा आणि पाहा की देवाला हे असे खरंच नको आहे.

    नंतर इस्राएलाचे सर्व वडील जमा होऊन रामा येथे शमुवेलाकडे आले.

    ते त्याला म्हणाले, पाहा, आता तुम्ही वृद्ध झाला आहात आणि तुमच्या मार्गाने तुमचे पुत्र चालत नाहीत; तर आता इतर सर्व राष्ट्रांप्रमाणे आमचा न्यायनिवाडा करायला आमच्यावर एक राजा नेमा.

    आमचा न्यायनिवाडा करायला आम्हांला एक राजा द्या, असे ते म्हणाले त्यामुळे शमुवेलास वाईट वाटले. मग शमुवेलाने परमेश्वराची प्रार्थना केली. तेव्हा परमेश्वर शमुवेलाला म्हणाला, "लोक जे तुला सांगत आहेत ते सगळे ऐक; कारण त्यात ते तुझा धिक्कार करत नाहीत, तर मी त्यांचा राजा नसावे म्हणून ते माझाच धिक्कार करत आहेत.

    १ शमुवेल ८:४-७

    २. बलाम मवाबाच्या राजाला भविष्यवाणी करण्याची संधी मागत राहिला तेव्हा तो देवाच्या परिपूर्ण इच्छेतून बाहेर पडला.

    परमेश्वराने बलामाला हे स्पष्ट केले होते की त्याची इच्छा नव्हती की, त्याने मावाबाचा राजा बालाक याच्याशी काही संबंध ठेवू नये. तथापि, बलामाला काही पैसे हवे होते जे बालाक त्याला देऊ इच्छित होता. त्याने राजाशी बोलावे म्हणून देवाला अनुमती देण्यास भाग पाडले. अखेरीस देवाने म्हटले की त्याने गेले पाहिजे. त्याने त्यांच्याशी कसे बोलावे याविषयी देवाने त्याला सल्ला देखील दिला. आधुनिक ख्रिस्ती व्यक्तीने याचा अर्थ काढला असता की हि देवाची इच्छा आहे. हा परिच्छेद आपल्याला हि सावधगिरी दाखवून देतो की, परमेश्वर आपल्याला आपल्या गोष्टी करू देतो जेव्हा त्याला समजते की आपण बंडखोर झालो आहोत.

    नंतर देवाने बलामाकडे येऊन त्याला विचारले, तुझ्याबरोबर असलेली ही माणसे कोण आहेत?

    बलामाने देवाला उत्तर दिले, "मवाबाचा राजा, सिप्पोराचा मुलगा बालाक ह्याने मला असा निरोप पाठवला आहे की,

    ‘पाहा, मिसर देशाहून लोकांचा समुदाय आला असून त्याने भूतल झाकून टाकले आहे; तर आता तू येऊन माझ्याकरता त्यांना शाप दे; तू तसे केलेस तर त्यांच्याशी लढून मला त्यांना कदाचित हाकून लावता येईल."’

    देव बलामास म्हणाला, तू त्यांच्याबरोबर जाऊ नकोस व त्या लोकांना शाप देऊ नकोस, कारण ते आशीर्वादित लोक आहेत.

    सकाळी उठल्यावर बलामाने बालाकाच्या सरदारांना सांगितले, आपल्या देशाला परत जा, कारण तुमच्याबरोबर यायला परमेश्वराने मला मनाई केली आहे.

    तेव्हा मवाबी सरदार मार्गस्थ झाले आणि बालाकाकडे जाऊन म्हणाले की, बलाम आमच्याबरोबर येण्यास कबूल नाही.

    मग बालाकाने पहिल्यापेक्षा जास्त व अधिक प्रतिष्ठित सरदार पुन्हा पाठवले.

    ते बलामाकडे जाऊन म्हणाले, "सिप्पोराचा मुलगा बालाक ह्याची विनंती आहे की, ‘माझ्याकडे येण्यास काही अनमान करू नकोस,

    मी खात्रीने तुझा मोठा सन्मान करीन; तरी तू अवश्य येऊन माझ्याकरता ह्या लोकांना शाप दे."’

    बलाम बालाकाच्या सेवकांना म्हणाला, "बालाकाने आपले घर भरून सोनेरुपे मला दिले तरी परमेश्वर माझा देव ह्याच्या शब्दाबाहेर मला कमीजास्त काहीएक करता येत नाही.

    तरीपण कृपा करून आज रात्री तुम्ही येथे राहा म्हणजे परमेश्वर मला आणखी काही सांगतो की काय ते मला कळेल. रात्री देव बलामाकडे येऊन त्याला म्हणाला, हे पुरुष तुला बोलवायला आलेले असतील तर त्यांच्याबरोबर जा; मात्र जे मी तुला सांगेन तेवढेच कर."

    बलाम सकाळी उठला आणि आपल्या गाढवीवर खोगीर घालून मवाबी सरदारांबरोबर गेला.

    पण तो गेल्यामुळे देवाचा कोप भडकला आणि त्याला अडवण्यासाठी परमेश्वराचा दूत वाटेत त्याला आडवा आला. बलाम गाढवीवर बसलेला होता आणि बरोबर त्याचे दोन सेवक होते.

    गणना २२:९-२२

    ३. जेव्हा इस्राएल लोकांनी धन संपत्तीची लालसा केली तेव्हा ते देवाच्या परिपूर्ण इच्छेतून बाहेर पडले.

    तरी ते त्याची कृत्ये लवकरच विसरले; त्याच्या योजनेसंबंधाने त्यांनी धीर धरला नाही. रानात त्यांची वासना अनावर झाली; ओसाड प्रदेशात त्यांनी देवाची परीक्षा पाहिली.

    तेव्हा त्याने त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना दिले, पण त्यांचा जीव झुरणीस लावला.

    स्तोत्रसंहिता १०६:१३-१५

    इस्राएल लोकांना, अगदी आधुनिक मंडळीप्रमाणे, पैशाची इच्छा अनावर झाली. त्या दिवसात ज्याप्रमाणे घडले, त्याप्रमाणे देवाने त्यांना संपन्न उपदेशकांना दिले ज्यांनी देवाच्या वचनाचा वापर पृथ्वीवरील गोष्टींची त्यांची तलफ वैद्य ठरवली.

    उपस्थित लोक व समृद्धीचे उपदेश यावर सातत्याने दिलेला जोर ही देवाची इच्छा असल्यासारखे दिसून येते. जमलेला मोठा लोकसमुदाय आणि अनेक सेवकांचे वरकरणी यश यामुळे अशी धारणा होते की देव सर्व गोष्टींविषयी आनंदी आहे.

    असे वाटले होते की देवाने इस्राएल लोकांच्या समृद्धीच्या इच्छेचे उत्तर दिले होते परंतु ते देवाच्या अपरिपूर्ण इच्छेत होते कारण देवाने त्यांना समृद्धीची लालसा बाळगल्यानंतर शिक्षा दिली. आणि त्यांचा जीव झुरणीस लागला ही ती शिक्षा होती.

    जर ते योग्य ते करत असते तर देवाने त्यांना शिक्षा दिली नसती.

    देवाची इच्छा आहे की त्याच्या मुलांची प्रगती व्हावी परंतु चुकीच्या मार्गाने आणि चुकीच्या कारणांसाठी नाही. त्याने त्यांना समृद्धी दिली कारण तो समृद्धीच्या विरूद्ध नाही. आज, देव त्याच्या मंडळीला समृद्धी देत आहे परंतु असे दिसते की यासोबत जीव झुरणीस लागतो अध्यात्मिक उथळपणा, रोग, घटस्फोट, अनैतिकता आणि समलैंगिकता येत आहे. आपण परमेश्वराने आपल्याला जे द्यावे म्हणून त्याच्यावर दबाव आणतो त्याविषयी सावध राहूया कारण आपल्याच मार्गाने जाण्याचा हट्टीपणा सोबत असलेल्या दंडामुळे आपण आनंदी होऊ शकत नाही.

    ४. इस्राएल लोकांनी वासराची मूर्ती करण्यासाठी अहरोनावर दबाव आणला, तेव्हा त्यांनी देवाच्या अपरिपूर्ण इच्छेत प्रवेश केला.

    इस्राएल लोकांनी त्यांचे नेतृत्व करण्यासाठी अहरोनाला देव बनवायला सांगितले तेव्हा असे वाटले की त्यांनी त्यांचा मार्ग धरला होता.

    अहरोनाने त्यांच्यासाठी वासरू बनवले तेव्हा त्यांनी असा विचार केला असेल की देवाने एक नवीन धर्म सुरू केला आहे ज्यामध्ये मूर्तिपूजेचा समावेश आहे.

    इस्राएल लोक आपल्या नवीन धर्मात आनंदित झाले असे मानत की अहरोनाच्या सहभागामुळे देवाने त्यांना मान्यता दिली होती.

    देवाच्या माणसाने त्यांचे नेतृत्व केले असले तरी ते देवाच्या इच्छेत नव्हते. त्यांना देवाच्या अपरिपूर्ण इच्छेत असल्याची शिक्षा भोगण्यासाठी फार काळ लागला नाही.

    मोशेला पर्वतावरून उतरण्यास विलंब लागला असे लोकांनी पाहिले तेव्हा ते अहरोनाभोवती जमून त्याला म्हणाले, ऊठ, आमच्यापुढे चालतील असे देव आमच्यासाठी बनव; कारण आम्हांला मिसर देशातून बाहेर आणणारा हा मनुष्य मोशे ह्याचे काय झाले हे आम्हांला कळत नाही.

    तेव्हा अहरोनाने त्यांना सांगितले की, तुमच्या स्त्रिया, पुत्र व कन्या ह्यांच्या कानांतील सोन्याची कुंडले काढून माझ्याकडे घेऊन या. मग सर्व लोकांनी आपल्या कानांतील सोन्याची कुंडले काढून अहरोनाकडे आणली.

    त्याने ती त्यांच्या हातून घेऊन त्यांचे एक वासरू ओतून त्याला कोरणीने कोरले; तेव्हा ते म्हणू लागले की, हे इस्राएला, ज्या देवांनी तुला मिसर देशातून आणले आहे तेच हे तुझे देव.

    निर्गम ३२:१-४

    त्यांनी होरेब येथे वासराची मूर्ती केली, ओतीव मूर्तीची पूजा केली.

    त्यांनी आपले ऐश्वर्य जो परमेश्वर त्याच्याऐवजी गवत खाणाऱ्या बैलाची प्रतिमा स्वीकारली.

    ते आपल्या उद्धारक देवाला विसरले; त्याने मिसर देशात महत्कृत्ये,

    हामाच्या देशात अद्भुत कृत्ये, तांबड्या समुद्राजवळ भयानक कृत्ये केली होती.

    तेव्हा तो म्हणाला, ह्यांचा नायनाट केला पाहिजे; पण त्याचा क्रोध शांत करावा, व त्याने त्यांचा नाश करू नये, म्हणून त्याचा निवडलेला मोशे त्याला आडवा आला.

    स्तोत्रसंहिता १०६:१९-२३

    ५. नादाब आणि अबीहू यांनी परमेश्वराची आज्ञा नसताना यज्ञ केला तेव्हा ते परमेश्वराच्या अपरिपूर्ण इच्छेत होते.

    परमेश्वरासाठी यज्ञ करणे एक चांगली गोष्ट आहे. नादाब आणि अबीहू ह्यांनी अगदी तेच केले. त्यांनी परमेश्वराला यज्ञ केले. पण तो त्यांच्यावर संतुष्ट नव्हता. या कारणाने प्रत्यक्षात त्यांना मरण आले. पुन्हा एकदा, आपण पाहतो की लोक चांगल्या गोष्टी करीत आहेत परंतु त्यासाठी त्यांना शिक्षा मिळाली कारण ती देवाची

    Enjoying the preview?
    Page 1 of 1