Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

सापासारखे चतुर होणे म्हणजे काय
सापासारखे चतुर होणे म्हणजे काय
सापासारखे चतुर होणे म्हणजे काय
Ebook300 pages1 hour

सापासारखे चतुर होणे म्हणजे काय

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

येशून म्हटलेः सापासारखे चतुर व कबूतरासारखे साळसूद व्हा. साप खरंच चतुर आहेत का? येशूने असा सल्ला का दयावा? डॅग हेवर्ड हिल्सचे पुस्तक वाचा आणि सापाचे लपलेले चातृर्य जाणा.

Languageमराठी
Release dateJun 20, 2018
ISBN9781641354561
सापासारखे चतुर होणे म्हणजे काय
Author

Dag Heward-Mills

Bishop Dag Heward-Mills is a medical doctor by profession and the founder of the United Denominations Originating from the Lighthouse Group of Churches (UD-OLGC). The UD-OLGC comprises over three thousand churches pastored by seasoned ministers, groomed and trained in-house. Bishop Dag Heward-Mills oversees this charismatic group of denominations, which operates in over 90 different countries in Africa, Asia, Europe, the Caribbean, Australia, and North and South America. With a ministry spanning over thirty years, Dag Heward-Mills has authored several books with bestsellers including ‘The Art of Leadership’, ‘Loyalty and Disloyalty’, and ‘The Mega Church’. He is considered to be the largest publishing author in Africa, having had his books translated into over 52 languages with more than 40 million copies in print.

Related to सापासारखे चतुर होणे म्हणजे काय

Related ebooks

Reviews for सापासारखे चतुर होणे म्हणजे काय

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    सापासारखे चतुर होणे म्हणजे काय - Dag Heward-Mills

    समावेश

    सापांचे चातुर्य

    अवलंबून न राहण्यात निपूण

    आंतरिक सामर्थ्यात निपूण

    तोंडाच्या सामर्थ्यात निपूण

    साप हे अपंगत्वावर मात करण्यात निपूण असतात

    स्वतःला पूर्णपणे वाहून देण्यात निपूण

    डावपेचात निपूण

    जीवंत राहण्यात निपूण

    समाधानी असण्यात निपूण

    धीर धरण्यात निपूण

    काटकसरीत निपूण

    लपणे व भरभराटीस लागण्यात निपूण

    स्वसंरक्षण करण्यात निपूण

    अशुध्द आत्म्यांवर विजय मिळविण्यात निपूण

    नावलौकिक मिळविण्यात निपूण

    मनुष्यांबरोबर शांतीने राहण्यात निपूण

    जोडीदाराला काबूत ठेवण्यात निपूण

    गतीत निपूण

    संवेदनेनुसार कार्य करण्यात निपूण

    अनिश्चितेत निपूण

    एकटे काम करण्यात निपूण

    इतरांबरोबर काम करण्यात निपूण

    अमूलाग्र बदल करण्यात निपूण

    प्रकरण 1

    सापांचे चातुर्य

    .....हयास्तव तुम्ही सापांसारखे चतुर व कबूतरासारखे साळसूद व्हा.

    मत्तय 10:16

    मनुष्य सापांना घाबरतात ह्यात काही आश्चर्य नाही. लोकांच्या मनात सापांबददल योग्य मान आहे हयात आश्चर्य नाही. ही वास्तविकता आहे की साप हे अद्भूत प्राणि आहेत, त्यांच्या विरूध्द सर्वसाधारण द्वेश असूनही ते उत्तम रित्या जगत आहेत व संख्येने वाढत आहेत.

    जर येशू सापांच्या हुशारी बद्दल काही बोलला नसता तर आणि ते जे हुशारी ने जगतात त्याकडे दुर्लक्ष केले असते. येशूने सापांचे चातुर्य दाखवून दिले म्हणून आपण हया प्राण्यांकडे विशेष लक्ष लावावे आणि त्यांच्या कडून जे शिकता येईल ते शिकावे. मग सापांचे चातुर्य काय आहे? कोणती गोष्ट सापांना चतुर बनविते?

    तुमच्या सहका-यापेक्षा तुम्हाला अधिक भरभराटीस नेणारे चातुर्य माहीत करून घेण्याची तुमची इच्छा नाही का?

    प्रगल्भ विरोध आणि द्वेश हयाच्यामध्ये तुम्हाला यशस्वी करण्यास समर्थ चातुर्याबद्दल तुम्ही जाणू इच्छिणार नाही का?

    जीवनाच्या बदलणा-या चित्रांमध्ये तुम्हाला भरभराटी कडे नेण्यास समर्थ चातुर्याबद्दल तुम्ही शिकू इच्छित नाही का? शेवटी जीवनाच्या सर्व परिस्थिती मध्ये किती लोक श्रीमंत व भरभराट पूर्ण राहू शकतील?

    तुम्हाला ते चातुर्य नको का ज्यामूळे लोक तुमचे भय धरतील आणि तुम्हाला योग्य सन्मान देऊन तुमच्या बरोबर वागतील? तुम्हाला ती हुशारी नको का जी तुम्हाला तुमच्या जीवनातील जे धेय शांतपणे प्राप्त करण्यासाठी मदत करेल?

    मला खात्री आहे की तुम्हाला ते चातुर्य पाहीजे. ते चातुर्य सापांचे आहे! म्हणूनच येशू म्हणाला आपण सापांसारखे चतुर असलो पाहिजे.

    सात कारणे ज्यामूळे साप चतुर आहेत असे मानले जाते.

    1. सापांना चतुर किंवा हुशार मानले जाते कारण इतर कुठल्याही जंगली प्राण्यांपेक्षा ते संख्येने वाढले.

    2. सापांना चतुर मानले जाते कारण सतत आधुनिक होणा-या जगातही ते अस्तीत्वात आहेत. तुमच्या लक्षात येईल की अनेक जंगली प्राणी हया आधुनिक जगात लोप पावत आहेत.

    3. जरी सर्व लोक त्यांना द्वेश करत असले तरी त्यांची भरभराट होत आहे म्हणून साप चतुर आहेत असे मानले जात आहे.

    4. सापांना चतुर मानले जाते कारण ते मानवांमध्ये भय आणि सन्मान निर्माण करतात. मानव ब-याच प्राण्यांना घाबरत नाही किंवा त्यांना मान देत नाहीत परंतू ते सापांना घाबरतात आणि त्यांना मान देतात.

    5. सापांना चतुर मानले जाते कारण ते प्रत्येक खंडावर आणि जगाच्या प्रत्येक भागात राहतात.

    6. सापांना चतुर मानले जाते कारण सर्व क्षेत्रात, जमीन, सागर, ताजे पाणी आणि हवेतही कार्य करतात.

    7. सापांना चतुर मानले जाते कारण हया जगामध्ये त्यांचे ध्येय गाठण्याची क्षमता त्यांच्या मध्ये आहे. सापांच्या विरूध्द इतक्या समस्या असल्या तरी ते जगण्यास, उदार निर्वाह करण्यास आणि बहुगुणीत होण्यास समर्थ आहेत.

    चतुर होण्यासाठी तुम्ही विचार केला पाहीजे, वास्तविकता, सत्य आणि विधानांवर विचार व मनन केले पाहीजे. जे गहन विधान आहेत ज्यात फार अर्थ भेद आहे त्यावरून तुम्ही वरवर नजर फिरवू नये. येशूने म्हटले, ‘सापासारखे चतुर व्हा’. तो महान वाक्य बोलत होता, असे विधान जे ज्ञान, अर्थ व मार्गदर्शनाने भरलेले होते. हया पुस्तकातील प्रत्येक प्रकरणामध्ये सापांच्या महान ज्ञानाचा एक पैलू आहे ज्यामूळे ते प्राणी संग्रहालयात दिसणा-या इतर कुठल्याही प्राण्यापेक्षा अधिक यशस्वी झाले आहेत.

    तुम्ही हयाचा विचार केला का की तुमच्या घराच्या अवतीभोवती सिंह फिरत नाहीत? परंतू तुमच्या आजूबाजूला साप मात्र आहेत. कमीत कमी मी जिथे राहतो तिथे मी सापांना सर्वत्र पाहिले आहे. तुमच्या सभोवति सिंह अस्तीत्वात नाहीत. त्यांचा नाश झाला कारण ते सापांच्या चातुर्यानुसार कार्य करत नाहीत. ते वेगळया चातुर्यानुसार कार्य करतात- सिंहांचे चातुर्य.

    सिंहांच्या चातुर्यामूळे आपल्याला सिंहाची भिती वाटते आणि आपण त्यांचा सन्मान करतो. परंतू सिंहाच्या चातुर्याने त्यांना जगभरातील सर्व शहरांमध्ये भरभराट करण्यास आणि बहूगुणित होण्यासाठी मदत केली नाही. सिंहाची संख्या कमी होत आहे! ते लुप्त होत आहेत! दुसरीकडे साप मात्र आश्चर्यकारक रित्या प्रत्येक शहरात व शेजारीपाजारी दिसतात. त्यानुसार साप हे सिंहापेक्षा चतुर आहेत कारण ते टिकले, त्यांची भरभराट झाली आणि ते वाढले जेव्हा की सिंह कमी झाले आणि आता जवळ जवळ विलुप्त होत आहेत.

    प्रकरण 2

    अवलंबून न राहण्यात निपूण

    बाहेरच्या लोकांबरोबर सभ्यतेने वागावे आणि तुम्हास कशाचीहि गरज पडू नये म्हणून आम्ही तुम्हास आज्ञा केल्याप्रमाणे स्वस्थ राहणे आपआपला व्यवसाय करणे आणि आपल्या हातांनी काम करणे हयांची हौस तुम्हांला असावी.

    1 थेस्सलनी 4:11,12

    साप हुशार आहेत कारण ते बाहेरच्या लोकांवर अवलंबून राहत नाहीत.

    एका पुढा-यानी बाहेरील लोकांचा सन्मान मिळविण्यासाठी कोणावरही अवलंबून राहू नये. सेवाकांनी सर्व प्रकारचे भिक मागणे टाळण्यासाठी कठिण परिश्रम करावे. भिक मागणे हे भिक मागणे आहे मग ते राष्टपति, राजकिय नेते किंवा पाळक कोणीही करित असो. जरी भिक मागण्याला गुंतवणूक करणारे मिळविणे, मदत मिळविणे किंवा दान देणा-यांच्या सभेत भाग घेणे असे नाव दिले तरी ती भिकच आहे. इतरांवर अवलंबून राहण्याचा दुसरा पर्याय म्हणजे कि स्वतःकडे लक्ष देणे व आपल्या हातांनी काम करणे.

    तुम्ही वस्तू मागत भिक का मागता? दावीद जे म्हणाला ते तुम्ही वाचले नाही का, ....‘नितिमान निराश्रित झालेला किंवा त्याची संतति भिकेस लागलेली मी पाहीली नाही’. (स्तोत्र 37:25) कोणीतरी आपल्याला काही तरी दयावे हयाची अपेक्षा करित जीवन जगण्याची तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्हाला असे वाटते का की जेव्हा तुम्ही बाहेरील लोकांवर अवलंबून राहता तेव्हा ते तुम्हाला मान देतात? ते मान देत नाहीत! वचन लक्षपूर्वक वाचा आणि त्याच्यावर मनन करा. ‘बाहेरच्या लोकांबरोबर सभ्यतेने वागावे आणि तुम्हांस कशाचीही गरज पडू नये म्हणून, आम्ही तुम्हांस आज्ञा केल्याप्रमाणे स्वस्थ रहाणे, आपआपला व्यवसाय करणे आणि आपल्या हातांनी काम करणे, हयांची हौस तुम्हांला असावी.’ (1 थेस्ल्लनी 4:11)

    साप हे दाखवितात कि ते स्वतंत्र जीवनाचे वस्ताद आहेत. जन्मलेल्या दिवसापासून ते स्वतःच्या बलावर जगण्यासाठी सक्षम असतात. सापसारखे चतुर राहण्यासाठी तुम्ही स्वतंत्र असावे किंवा कोणावरही अवलंबून राहू नये. जेव्हा गरीब देशाचे राष्टपती श्रीमंत देशांकडून देणगी किंवा कर्ज मगातात तेव्हा ते दुःखद दृष्य असते.

    दुर्दैवाने अनेक देश दुस-या देशाच्या गुलामीत होते आणि त्याच्यावर सत्ता चालविणा-यां शिवाय ते जगू शकले नाही. ते स्वतंत्रतेसाठी सक्षम नाहीत. अनेक गरीब देश हे पराभूत आहेत, व ते स्वतःचे राज्य चालवू शकत नाहीत! ते त्यांच्या स्वात्रंत्यासाठी लढले परंतू ते अजीबात स्वतंत्र नाहीत. ते दर वर्षी त्यांच्या स्वातंत्र्याचा उत्सव करतात जेव्हा की त्यांनी त्यांच्या अवलंबनाचा शोक केला पाहीजे!

    आशाहीन लायक नसलेल्या पुढा-यांनी राष्ट्रावर राज्य चालवून त्यांना खोल दारिद्रयात नेणे आहे. ही वास्तविकता की पुढारी दोन शहरांमध्ये रस्ते बांधू शकत नाही, वीज, पाणी, शाळा आणि दावाखान्यांचा पूरवठा करू शकत नाही, हे त्यांच्या गरीब व नालायक पुढारीपणाचा पूरवा आहे. काही गरीब देशांच्या पुढा-यांसाठी पुढारीपण म्हणजे इतरत्र जाऊन पैश्याची भिक मागणे.

    साप, मात्र जन्मलेल्या दिवसापासून त्यांच्या आईवडीलांपासून विभक्त जीवन जगू शकतात स्वतंत्र असतात. अनेक साप हे ते जन्मले त्या दिवसापासून शिकार करू शकतात आणि जीवनाच्या पहिल्या दिवासापासून एकटेच जीवन जगतात. काही देश ज्यांना मदतीची आणि इतर राष्ट्राकडून देणगीची गरज पडते त्या प्रमाणे सापांना कोणत्याच मदतीची गरज पडत नाही आणि ते यशस्वी स्वतंत्र जीवनाची लगेच सुरवात करू शकतात.

    तुम्ही स्वतंत्रतेसाठी सक्षम आहात हे कसे दाखवावे.

    1. जर तुम्ही सापासारखे चतुर आहात तर तुम्ही पैसा, देणगी, अर्थ साहाय किंवा कर्जाची अपेक्षा न करत जीवन जगाल.

    पण अब्राम सदोमाच्या राजाला म्हणाला, परमेश्वर परात्पर देव आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी याजसमोर मी बाहू उभारून सांगतो की तुमच्या एक सुतळीचा तोडा किंवा वहाणेचा बंद मी घेणार नाही, मी अब्रामास संपन्न केले आहे म्हणावयास तुम्हाला कारण न मिळो.

    उत्पत्ती 14:22-23

    अब्राहामाला श्रीमंत होण्यासाठी कोणाचीही गरज नव्हती. खंरतर त्याची इच्छा होती की कोणीही असे म्हणू नये की त्यांनी त्याला श्रीमंत केले आहे.

    लहान मुलं हे अपेक्षा करत असतात की त्यांचे आई आणि वडील हे त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना काहीतरी देतील. जेव्हा कोणी तरी स्वावलंबी किंवा स्वतंत्र जीवन जगण्यासाठी असमर्थ असते तेव्हा त्याची अपेक्षा असते की कोणी तरी त्याला काही दयावे. अनेक लोक अमेरिका किंवा इंग्लंड कडे नजर लावतात हया अपेक्षेने कि काही तरी प्राप्त होईल. ही वास्तविकता की तुम्ही असा विचार करता कि अमेरिकेतील किंवा यूरोप मधील लोक तुमच्या मदतीसाठी पूढे येतील हे दर्शवितो की तुम्ही स्वतंत्र जीवन जगण्यासाठी असमर्थ आहात.

    तुम्ही ही अपेक्षा करू नये की बाहेरील कोणीतरी तुम्हाला श्रीमंत करील. कोणी तरी तुम्हाला काहीतरी दयावे अशी तुमची इच्छा का आहे? तुम्ही नेहमी देणगी, कर्ज किंवा वापरलेल्या वस्तूची वाट किंवा आशा का ठेवता? वास्तविकतः जेव्हा लायकी नसलेले पुढारी तुम्हाला सांगतात की ते एखादे काम सुरू करण्यासाठी कर्ज शोधत आहेत तेव्हा ते तुमच्या डोळया धूळ उधळतात. बरेचदा कर्जाची गरजच नसते. खरं तर व्यर्थ घालविणे, भ्रष्टाचार आणि उपलब्ध वस्तूची अपव्यय हे थांबविण्याची गरज असते. वाईट पुढारी कर्ज घेण्याबददल बोलून अनेकांना फसवितात. परंतू जे हया धूरातून व अंधूकतेतून पाहू शकतात ते सांगू शकतात कि कर्जाची गरज नाही.

    तुम्ही तुमचे जीवन असे जगले पाहीजे की त्याने तुम्हाला बाहेर देणगीदारांपासून स्वतंत्र करावे. आशाहिन लायकी नसलेले पुढारी हे नेहमी देणगी सभेला जाण्यासाठी आनंदी असतात हयासाठी की कोणते अनुदान किंवा देणगी त्यांना मिळू शकते त्यासंबंधी ऐकता येईल. आश्चर्याची गोष्ट ही की त्यातील अनेक पुढारी हया सभेमध्ये झोपतात कारण जेव्हा पुढारीपणाचा प्रश्न येतो तेव्हा ते त्यात रुजलेले नसतात.

    तुमची हुशारी तुम्हाला उभे राहण्यासाठी आणि स्वतःची बांधणी करण्यासाठी सहाय करेल. म्हणूनच जेव्हा मनुष्य बांधणी करतो तेव्हा तो हुशार आहे असे म्हटल्या जाते. बांधणी करण्यासाठी सक्षम नसणे हयातुन ज्ञानाची कमतरता दिसून येते. जर तुम्ही सापासारखे चतुर असले तर तुम्ही उठून तुम्हाला आवश्यक त्या गोष्टींची बांधणी कराल. शलमोनाने स्वतः अनेक गोष्टी बांधल्या. त्याने घरं बांधले, द्राक्षमळे लावले, बागबगीचे तयार केले आणि सर्व प्रकारचे फळं लावले आणि तळेही तयार केले.

    मी मोठेमोठी कामे हाती घेतली, आपल्यासाठी घरेंदारे बांधिली. द्राक्षमळे लाविले मी आपल्यासाठी

    Enjoying the preview?
    Page 1 of 1