Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

सेवाकार्याची कला
सेवाकार्याची कला
सेवाकार्याची कला
Ebook395 pages2 hours

सेवाकार्याची कला

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

एक कला विकसित करण्याची क्षमता म्हणजे एक प्रकारची कुशलता किंवा विशेष कौशल्य असते. पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की कृपामर्जी तर कुशल लोकांना येते. सेवाकार्याच्या कार्य तर खूप क्षमतेची मागणी करते. हे नवीन पुस्तक, ‘’सेवकार्याची कला’’ तर ज्या सर्वाना सेवाकार्य करायचे असते त्याची इच्छा बाळगणारे असते. सेवेबद्दल काय चुकीचे आणि बरोबर असते हे तर थेट प्रस्तुत करून, सेवाकार्याचे काम काय आहे, सेवाकार्यात तुमच्याकडून काय अपेक्षित आहे आणि तसेच सेवकार्याची कामे तुम्ही कशी करता. तुम्ही सेवेत कसे काम करता ह्यावर कधी विचार केला आहे का? डाग-हेवार्द मिल्स ह्यांचे हे उत्कृष्ट पुस्तक तर तुम्हाला देवाचे पाचारण ह्याबद्दल पात्र म्हणून बनण्यास आवाहन देईल आणि सेवेच्या कार्यासाठी तुम्हाला पूर्णपणे स्वतःला देण्यास मार्गदर्शन करेल.

Languageमराठी
Release dateJun 19, 2018
ISBN9781641354387
सेवाकार्याची कला
Author

Dag Heward-Mills

Bishop Dag Heward-Mills is a medical doctor by profession and the founder of the United Denominations Originating from the Lighthouse Group of Churches (UD-OLGC). The UD-OLGC comprises over three thousand churches pastored by seasoned ministers, groomed and trained in-house. Bishop Dag Heward-Mills oversees this charismatic group of denominations, which operates in over 90 different countries in Africa, Asia, Europe, the Caribbean, Australia, and North and South America. With a ministry spanning over thirty years, Dag Heward-Mills has authored several books with bestsellers including ‘The Art of Leadership’, ‘Loyalty and Disloyalty’, and ‘The Mega Church’. He is considered to be the largest publishing author in Africa, having had his books translated into over 52 languages with more than 40 million copies in print.

Related to सेवाकार्याची कला

Related ebooks

Reviews for सेवाकार्याची कला

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    सेवाकार्याची कला - Dag Heward-Mills

    अध्याय १

    देवाची वरदाने आणि पाचारण पश्चातापाच्या शिवाय आहेत

    पहिले पाचारण

    अमित्तयाचा पुत्र योना ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, ऊठ, त्या मोठ्या निनवे शहरास जा व त्याच्याविरुद्ध आरोळी कर; कारण त्याची दुष्टता माझ्यापुढे आली आहे.

    योना १:१-२

    दुसरे पाचारण

    परमेश्वराचे वचन दुसर्यांदा योनाला प्राप्त झाले की, ऊठ; त्या मोठ्या निनवे शहरास जा व मी तुला सांगेन तो संदेश त्याला आरोळी करून सांग.

    योना ३:१-२

    देव हा दयाळू परमेश्वर आहे! त्याचे आज्ञापालन करण्याची तुम्हाला तो दुसरी संधी देईल. ऐकून आज्ञापालन करण्याची दुसरी संध योनाला मिळाली. काही वेळा आपल्याला एकच संधी असते!

    दुसरी संधी देणारा देव

    कदाचित, तुम्ही मंडळीत सदैव काम करावे असे देवाला वाटत असेल आणि म्हणून त्याने तुम्हाला निर्माण केले. कदाचित देवाचे पाचारण ह्यापासून तुम्ही दूर पळत असाल. पण पुन्हा देव तुमच्याशी बोलत आहे. देव योनाशी दोनदा बोलला. पहिले आणि दुसरे पाचारण ह्यामध्ये ,योनाला बरेच अनुभव आले. जीवनाच्या वादळांचा आणि मास्याच्या पोटात राहण्याचा त्याने अनुभव घेतला. कदाचित अनेक कठीण अनुभवांच्या नंतर, देवाचे ऐकण्याची तुमची तयारी असते.

    कदाचित तुम्ही हे पुस्तक वाचत असताना, त्याच्या घरात काम करण्याची देव तुम्हाला दुसरी संधी देत आहे. शेवटल्या युद्धासाठी सैन्यात सहभागी होण्याची ही वेळ आहे.

    पाचार्नात काहीच बदल नाही

    पहिले आणि दुसरे पाचारण सारखेच होते हे तुम्हाला दिसेल. दोन्ही पहिले आणि दुसरे पाचारण ह्यात, तोच संदेश घेऊन त्याच शहरात (निनवे) येथे योनाला पाठवण्यात आले. देवाची वरदाने आणि पाचारण हे तर पश्चातापाच्या शिवाय आहेत (रोमकरास पत्र ११:२९).

    जसजसा वेळ सरतो तसे देव काही आपले मन बदलत नाही. वादळे आणि मास्यांची पोटातील वेदना; तुम्ही सहन केली असली तरीही तो तुमचा उपयोग करू शकतो. देवाने पहिल्यांदा तुम्हाला बोलवले तेव्हापासून दहा वर्ष निघून गेले आहेत. त्याचे आज्ञापालन करण्यासाठी खूप काही उशीर झालेला नाही. मी तर जो देव कधीही त्याचे मन बदलत नाही अशा देवाची सेवा करतो ह्यात आनंदी आहे.

    देवाचे पाचारण स्वीकारणे म्हणजे तुम्ही जे नाही अशा स्थितीला स्वीकारणे. येशूने पेत्राला माणसे धरणारा बनवायचे ठरवले- जे तो नव्हताच!

    देवाच्या राज्यात काहीतरी मोठे योगदान देण्यासाठी सेवेत येणे असे नाही. काहीही तुमच्यावर अवलंबून नसते आणि तुम्ही सेवेकडे दुर्लक्ष केले तर काहीही नष्ट होणार नाही. आपण सगळे सौरक्षण न करण्यास जोगे आणि अनावश्यक आहोत.

    कारण सत्याविरुद्ध आम्हांला काही करता येत नाही, तर सत्यासाठी करता येते.

    २ करिंथकरास पत्र १३:८

    हे शास्त्रवचन आपल्याला शिकवते की देवाच्या वचनाच्या सत्याच्या विरुद्ध जाईल असे काहीच आपण करू शकत नाही. आपल्या सर्वाधिक चुका शुभ्वर्तामानाच्या सत्याला अडखळन बनू शकत नाही. आपल्या पाचार्नाकडे दुर्लक्ष करणे देवाच्या विजयी सैन्याचा मार्ग बदलू शकत नाही. ह्या कार्यासाठी आपले पाचारण होणे सौभाग्याचे आहे. सहभागी होणे सौभाग्याचे आहे. देवासाठी तुम्ही काहीतरी असामान्य करत आहात असा विचार करणे थांबवण्याची ही वेळ आहे.

    सेवाकार्यात राहणे एक विनम्र करणारा अनुभव आहे ज्यात तुम्ही प्रत्यक्षात देवाबद्दल शिकता आणि दया मिळवून घेता. येशूने त्याच्या शिष्यांना त्याचे अनुसरण करण्याचे सांगितले आणि तो त्यांना काहीतरी बनवेल असे सांगितले. पूर्ण-वेळ सेवाकार्यात, देव वापर करू शकेल अशा पात्रात तुम्ही घडवले जाणार आहात.

    येशू त्यांना म्हणाला, "माझ्यामागे या म्हणजे तुम्ही माणसे धरणारे व्हाल, असे मी करीन.

    मार्क १:१७

    पूर्ण-वेळ सेवाकार्यात, तुमच्या मानाच्या नाविकारणाने बदल होऊन अनेक विनम्र करणाऱ्या अनुभवांनी जे तुमची वाट पाहतात त्याने बदलून जाता. पूर-वेळ सेवाकार्य म्हणजे तुम्हाला देवाच्या अधिक जवळ आणणारा एक प्रवास व त्याची सुरुवात आहे. ते तुम्हाला बदलून एक विनम्र व्यक्ती म्हणून बदलून टाकते. ह्या तुछ कार्याचा मूळ स्वभाव आणि सेवाकार्यात इतर ख्रिस्ती लोकांशी संबंध ठेवणे निश्चितच तुम्हाला मोडून टाकून एक चांगली व्यक्ती बनवेल! आणि, बाहेरच्या लोकांशी संबंध ठेवणे ज्यांना पूर्ण-वेळ सेवाकार्य समजत नाही ते म्हणजे तुम्हाला देवाच्या अधिक जवळ घेऊन येईल.

    पूर्ण-वेळ सेवाकार्य काय नाही

    पूर्ण-वेल सेवाकार्यात असणे म्हणजे जेव्हा येशू तुम्हाला ‘’मासे धरणारा’’ बनवतो. सेवाकार्याने किमत मोजली जाणे म्हणजे आवश्यकच तुम्हाला पूर्ण-वेळ सेवक बनवत नाही.

    तुमच्या पगाराच्या स्रोताला बँकेतून मंडळीकडे वळवणे म्हणजे तुम्ही पूर्ण-वेळ सेवाकार्यात आहात असा नाही. पूर्ण-वेळ सेवाकार्य म्हणजे एक पूर्ण व्यापून टाकलेले पाहूल आहे ज्यात तुम्हाला पूर्णपणे प्रभूचे अनुसरण करावे लागते. तुम्ही त्याचे अनुसरण करणे म्हणजे बर्याच गोष्टींचा अर्थ आहे, त्यात खाली दिलेल्या बर्याच मुद्द्याची यादी देण्यात आली आहे.

    पूर्ण-वेळ सेवाकार्य म्हणजे काम बदलण्यासारखे तितके सोपे नसते. ती तर आयुष्यभराची एक समर्पकता असते. ते तुमच्या संपूर्ण पणाला गिळून टाकणे आणि देवाच्या सामर्थ्याने तुम्ही बदलून जाता.

    पूर्ण-वेळ सेवाकार्य ह्यातील काहीच नसते:

    • पूर्ण-वेळ सेवाकार्य हा काही सोयीचा कामाचा पर्याय नाही.

    • पूर्ण-वेळ सेवाकार्य हा काही सोपा कामाचा पर्याय नसतो.

    • पूर्ण-वेळ सेवाकार्य ही काही वडीलजणांसाठी निवृत्तीची योजना नसते.

    • पूर्ण-वेळ सेवाकार्य ही काही पुनरस्थापित झालेल्या कर्मचार्यांसाठी मांडणी नसते.

    • पूर्ण-वेळ सेवाकार्य हा काही लहान मुलांच्या मतांसाठी एक आश्रय नसतो.

    • पूर्ण-वेळ सेवाकार्य जे लोक उर्वरित आयुष्य इतर चांगल्या गोष्टी करताना शेवटल्या क्षणी मरण सहन करतात त्यांच्यासाठी इच्छा नसते.

    • पूर्ण-वेळ सेवाकार्य ही काही बदललेली व्यापारी सोय नसते. काही लोक तर एका बाजूला व्यापार करत पूर्ण-वेळ सेवाकार्य ह्याला नियमित पगार मिळवण्यासाठी वापरायचे असतो. व्यापार हा व्यापार आणि सेवाकार्य हे सेवाकार्य असते!

    • पूर्ण-वेळ सेवाकार्य ही काही काम करणाऱ्या लोकांसाठी एक कृतीच नसते.

    • जगिक ध्येय असणाऱ्या पुरुषांसाठी पूर्ण-वेळ सेवाकार्य ही काही मजबूत फळी नसते.

    • पूर्ण-वेळ सेवाकार्य म्हणजे दारिद्र्यातून वर येण्यासाठी एक योजना नसते. कधीतरी सेवाकार्य करण्यात आर्थिक दृष्टीने चांगले असते.

    • पूर्ण-वेळ सेवाकार्य म्हणजे जगिक क्षेत्रातील तुमचे काम सोडून मंडळीत परत जाण्यासारखे नसते. जगात तुम्ही एक लेखापाल असणे ही वास्तविकता ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही मंडळीत देखील तसे असावे.

    • पूर्ण-वेळ सेवाकार्य म्हणजे तुमच्या पगाराच्या स्रोताला बदलण्याबद्दल नसते.

    • पूर्ण-वेळ सेवाकार्य हे काही सुट्टीतले काम नाही. विद्यार्थी सुट्टीवर असताना जे करतात ते पूर्ण-वेळ सेवाकार्य नाही.

    पूर्ण-वेळ सेवाकार्य ह्याबद्दल भ्रम

    विभिन्न परिस्थितीत अनेक लोकांना त्रास्त्र करणारे वर्तमान परिस्थितील भ्रम असतात. पूर्ण-वेळ सेवाकार्य ह्यातील लोक त्यांच्या भ्रमाच्या परिस्थितीपासून बचावलेले नसतात. एका पूर्ण-वेळ सेवकाला त्रास देणारे काही भ्रम असतात:

    १. मी पूर्ण-वेळ सेवाकार्य ह्यात असल्याने विशेष आहे.

    २. मी पूर्ण-वेळ सेवाकार्य मध्ये असल्याने मला चांगला पगार असेल.

    ३. मी पूर्ण-वेळ सेवाकार्य ह्यात असल्याने मी सर्वोच्च अध्यात्मिक पौल उचलले आणि आता कोणतेही अध्यात्मिक पाउले उचलणे शिल्लक नाही.

    ४. पूर्ण-वेळ सेवाकार्य ह्यात मी असल्याने कोणत्याही सामान्य सेवकांच्या पेक्षा मी चांगला आहे.

    ५. पूर्ण-वेळ सेवाकार्य ह्यात मी असल्याने मला दूरपरदेशी देशांना भेट द्यावी लागेल.

    ६. पूर्ण-वेळ सेवाकार्य ह्यात मी असल्याने मला मोठे घर मिळेल.

    ७. पूर्ण-वेळ सेवाकार्य ह्यात मी असल्याने मला कार मिळेल.

    ८. पूर्ण-वेळ सेवाकार्य ह्यात मी असल्याने मी श्रीमंत होईल.

    ९. पूर्ण-वेळ सेवाकार्य ह्यात मी असल्याने मी अध्यात्मिक बनलो आहे.

    १०. पूर्ण-वेळ सेवाकार्य ह्यात मी असल्याने माझा विवाह आणि कौटुंबिक जीवन अधिक चांगले असेल.

    ११. पूर्ण-वेळ सेवाकार्य ह्यात मी असल्याने मला प्रार्थना, आराधना करण्यासाठी अधिक वेळ मिळतो आणि वचनाचा अभ्यास करतो.

    १२. पूर्ण-वेळ सेवाकार्य ह्यात मी असल्याने देव माझ्याशी संतुष्ट होतो.

    १३. पूर्ण-वेळ सेवाकार्य ह्यात मी असल्याने मी प्रीतीत चालत राहतो.

    १४. पूर्ण-वेळ सेवाकार्य ह्यात मी असल्याने माझा न्याय अधिक सोपा होईल.

    १५. पूर्ण-वेळ सेवाकार्य ह्यात मी असल्याने मी अभिषिक्त आणि सुरक्षित होतो.

    १६. पूर्ण-वेळ सेवाकार्य ह्यात मी असल्याने माझी लेकरे चांगले बनतील.

    १७. पूर्ण-वेळ सेवाकार्य ह्यात मी असल्याने मी सर्व मार्गाने स्वर्गात जाईल.

    १८. पूर्ण-वेळ सेवाकार्य ह्यात मी असल्याने प्रामणिक बनतो.

    वर दिलेल्या कोणत्याही गोष्टी खऱ्या आहेत. ते खरे असतील, पण तुमच्या बाबतीत त्यातील बरेचसे खरे नसतील. आणि अचानक घडणाऱ्या त्या गोष्टी निश्चित नाहीत. पूर्ण-वेळ सेवाकार्यात तुम्ही देवाचा शोध घ्यावा जेणेकरून त्याच्या सर्व योजना खऱ्या होतील.

    अध्याय २

    जगिक कार्य आणि सेवाकार्य ह्यातील फरक

    त्यात फरक आहे

    माझी सेवा व इतर देशातील राजांची सेवा ह्यांतील भेद त्यांना कळावा म्हणून ते त्याचे अंकित होतील.

    २ इतिहास १२:८, एनएएसबी

    जेव्हा रवाबामाने देवाच्या विरुद्ध बंडखोरी केली, संदेष्ट्याने त्याला थंडावणारा संदेश पाठवला. देवासाठी आणि जगातील राष्ट्रासाठी काम करण्यात तो त्याला फरक दाखवेल असे त्याने त्याला सांगितले.

    देवासाठी आणि जगासाठी काम करण्यात फरक असतो. ह्या क्षय पावणाऱ्या जगात संपत्ती ओला करणे ह्याची तुलना देवाच्या उच्च पाचारणाशी होऊ शकत नाही.

    खरे आधार घेऊन एक सार्वकालिक शहर बांधणे दैहिक मर्त्य मनुष्यासाठी सर्वोच्च भाग्य आहे. अनेक पुरुष त्यांच्या जीवनाची सुरुवात तात्पुरत्या गोष्टीने करतात ज्यात काही भविष्य नसते. साधारण मनुष्य तर तात्पुरते वाळूमधील इमले बांधणारे बनतात.

    फारो कोण आहे?

    फारो तर एक प्रकारचा ‘’सैतान ‘’ आहे. मिसर तर एक ‘’प्रकारचे’’ जग आहे आणि इस्राएल तर एक ‘’प्रकारचे’’ देवाचे लोक आहेत. फारोने देवाच्या लोकांना यातना आणि कष्ट देऊन यातना दिल्या आणि त्यांना वतन म्हणून शहरे बांधण्यास भाग केले. हे तर अत्यंत स्पष्टपणे आजच्या जगिक कार्याला व्यक्त करतात.

    ह्या जगात घालवण्यात येणारा बराचसा वेळ तर जगातील शहरे बांधण्यासारखे आहे. आपण मारून ह्या जगातून जोपर्यंत जातो, ह्या आकाशाखाली जगिक शहरांमध्ये फक्त सुंदर इमारती बांधल्या आहेत.

    ह्या जगाचे काम तर धिक जोम, तणाव आणि घाम गाळल्याने होते. ह्या जगातील वतन शहरे बांधण्याची काणीव न होता आपल्याला अधिक कष्ट करण्यासाठी भाग पाडले जातात. न्यू यॉर्क शहर, पारीस, लंडन, अकरा, लागोस, नैरोबी हे तर घाम गाळनार्या कष्टकरी मनुष्यांनी बांधण्यात आले.

    हे मानव तर मारून जातात आणि त्यांचे वतन मात्र राहते. त्यांच्या युअश्याच्या कार्याचा सारांश तर जगातील वतन शहरे बांधण्याच्या विकासात महत्वाचे असे होतात. तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा येशूला सैतान ह्या जगाचे राष्ट्र दाखवताना म्हणाला:

    आणि त्याला म्हटले, "ह्यांच्यावरचा सर्व अधिकार व ह्यांचे वैभव मी तुला देईन, कारण हे मला सोपवून दिले आहे व माझ्या मनास येईल त्याला मी हे देतो.

    लूक ४:६

    ह्यावरून दिसते की सैतान तर ह्या जगातील शहरांवर सत्ता गाजवतो. ह्या जगाचा देव सैतान आहे (२ करिंथकरास पत्र ४:४). सैतानाने ह्या मनुष्य पुत्रांना खुप्काष्ट दिले आणि ह्या जगातील शहरे बांधण्यासाठी मार्गदर्शन दिले.

    ख्रिस्ती लोक तर बांधकाम करणारे लोक ह्यांच्यात सैन्य ह्यात सहभागी होऊन आणि ही खजिने शहरे बांधण्यासाठी त्यांनी योगदान दिले.

    पुढे योसेफाची ज्याला माहिती नव्हती असा एक नवीन राजा मिसर देशावर आला.

    तो आपल्या लोकांना म्हणाला, पाहा, ह्या इस्राएल वंशाचे लोक आपल्यापेक्षा संख्येने व बलाने अधिक झाले आहेत; तर चला, आपण त्यांच्याशी धूर्तपणाने वागू या; नाहीतर ते संख्येने फार वाढतील आणि एखादा युद्धाचा प्रसंग आला म्हणजे ते आपल्या शत्रूंना सामील होऊन आपल्याशी कदाचित लढतील व ह्या देशातून निघून जातील.

    त्यांनी त्यांच्यावर कामाचा बोजा लादून त्यांना जेरीस आणावे, ह्या हेतूने त्यांच्यापासून बिगारकाम करून घेणारे मुकादम नेमले. तेव्हा त्यांनी फारोसाठी पिथोम व रामसेस ही कोठारांची नगरे बांधली;

    पण जितके अधिक त्यांनी त्यांना जाचले, तितके अधिक ते वाढून बहुगुणित झाले व त्यांचा चोहोकडे विस्तार झाला. त्यांना इस्राएलवंशजांचा तिटकारा वाटू लागला; म्हणून मिसरी लोक इस्राएलवंशजांपासून सक्तीने काम घेऊ लागले;

    निर्गम १:८-१३

    जसे फारोने मिसर देशावर नियंत्रण गाजवले, तसेच सैतान जग आणि त्या शहरांवर नियंत्रण गाजवतो. म्हणूनच ह्या जगाचा गोंधळ अगदी कळस गाठ्ण्यापर्यंत सातत्याने वाढत आहे.

    ह्या जगातील आर्थिक संस्था, बँक, आणि इतर जगिक संस्थांमध्ये जेव्हा तुम्ही काम करता, तुमची त्य्लना इस्राएलि लोक जे फारोसाठी काम करत होते त्यांच्याशी होते; खूप कष्ट, तणाव आणि इमले बांधण्यासाठी घाम गाळावा लागतो.

    मोशेने देखील इस्राएल लोकांना मुक्त करावे जेणेकरून ते प्रभूची सेवा करतील अशी विनंती केली. ज्या कोणाला पूर्ण-वेळ सेवेत यायचे असेल ते तर ह्या जगप्सून दूर जाण्याच्या परिस्थितीत स्वतःला पाहतात. पूर्ण-वेळ सेवाकार्य तर प्रभूसाठी एक सेवा आहे! मिसर देशातून जाऊन अरण्यत प्रभूसाठी अर्पण करून त्याच्यासाठी निवासमंडप बांधण्यासाठी जाण्याबद्दल ते होते!

    देवाची इच्छा आहे की लोकांनी येऊन त्यासाठी निवासमंडप बांधून त्याही आराधना करण्यासाठी वेळ घालवावा.

    स्वाभाविकच, जगिक पद्धतीपासून सुटका होणे सोपे असणार नाही. मोशे आणि इस्राएलच्या संततीसाठी मिसर देश सोडणे सोपे नव्हते. ठराविक निश्चित संघर्ष ह्याने देवाच्या लोकांनी शेवटी फारोकडून सुटका मिळवली.

    प्रिय मित्रां, तुम्हाला देखील जगिक कामापासून सुटका होणे इतके सोपे होणार नाही. जर ते घडेल तर त्यात खूप संघर्ष असेल..

    फारोपासून सुटका करून घेण्याचे चार स्तर

    आणि फारो आम्हांला जाऊ देईना; तेव्हा परमेश्वराने मिसर देशातील मनुष्य व पशू ह्यांचे सर्व प्रथमनर मारून टाकले; म्हणून उदरातून निघालेल्या सर्व प्रथमनरांचा मी परमेश्वराला बली अर्पण करतो; पण माझ्या मुलांतील ज्येष्ठ मुलाला मोबदला देऊन सोडवून घेतो.....

    निर्गम १३:१५

    इस्राएल लोकांना मुक्त सोडण्यास फारो खुश नव्हता. पूर्ण-वेळ सेवाकार्यात जाण्यासाठी प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने चार स्तरातून जाणे गरजेचे असते. ह्या पैकी कोणत्याही परिस्थिती जर तुमच्यापुढे आल्या तर त्या तुम्ही ओळखल्या पाहिजे.

    स्तर १: फारोला तुम्ही त्याचे काम सोडण्याची इच्छा नसते.

    तेव्हा फारो म्हणाला, हा कोण परमेश्वर की ज्याचे ऐकून मी इस्राएलास जाऊ द्यावे? मी त्या परमेश्वराला जाणत नाही, आणि इस्राएलास काही जाऊ देणार नाही.

    निर्गम ५:२

    तुम्ही मरुपार्यंत त्याच्यासाठी काम करावे अशी फारोची इच्छा असते. तुमचा मृत्यू होईपर्यंत घाम गाळून तुम्ही कष्ट करावे अशी त्याची इच्छा असते. सैतानाला माहित असते की अनेक लोक निवृत्तीच्या वयापर्यंत पोहोचणार नाहीत. कधीही प्रत्यक्षात न उतरणाऱ्या काल्पनिक निवृत्तीच्या प्रती काम करण्याच्या भ्रमात तो तुम्हाला ठेवण्याचा प्रयत्न करतो.

    स्तर २: फारो तुम्हाला देवाची सेवा करू देईल पण तुम्ही त्याच्याबरोबर राहावे अशी तो परवानगी देईल.

    मग फारोने मोशे व अहरोन ह्यांना बोलावून आणून म्हटले, "तुम्ही जा, ह्याच देशात आपल्या देवाला यज्ञ करा.

    निर्गम ८:२५

    त्याच्या पुढच्या स्तरात, फारो काहीतरी दबाव तुमच्यावर लादतो. तुम्ही देवाची सेवा करावी ह्याच्याशी सहमत होतो पण तरीही मिसर देशात तुम्ही राहिले पाहिजे. फारोचे पिरामिड बांधणे तुम्ही चालू ठेवावे. ह्या प्रकारच्या सेवेला अगदी सामुंय्पणे साधारण सेवाकार्य असे म्हंटले जाते. देवाची सेवा करणे, पण तरीही पैसा कमावण्याच्या जगिक पद्धतीशी चांगल्या प्रकारे जोडले जाणे!

    तुम्ही चर्चला कधी जावे आणि जाऊ नये हे फारो सांगेल. तुम्ही एकदा त्याच्या हाती पडल्यावर, तुम्ही त्याच्या मालकीचे अहत्त आणि तो सर्वकाही तुम्ही जे करावे ते ठरवतो. तुम्ही कधी उठावे आणि कधी झोपावे हे तो ठरवतो. आठवड्याच्या प्रत्येक दिवशी तुम्ही काय करावे हे तो ठरवतो. केवळ रविवारी आराम करण्यासाठी तो तुम्हाला देतो पण काही वेळा ते देखील तुमच्याकडून काढून घेतो.

    केवळ रविवारी दुपारी आणि बुधवारी संध्याकाळी तुम्ही देवाची सेवा करावी असे फारोने का तुम्हाला

    Enjoying the preview?
    Page 1 of 1