Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

त्यांना सांगा तुम्ही आत्मे जिंकणारा का व्हायला पाहिजे याची १२० कारणे
त्यांना सांगा तुम्ही आत्मे जिंकणारा का व्हायला पाहिजे याची १२० कारणे
त्यांना सांगा तुम्ही आत्मे जिंकणारा का व्हायला पाहिजे याची १२० कारणे
Ebook282 pages1 hour

त्यांना सांगा तुम्ही आत्मे जिंकणारा का व्हायला पाहिजे याची १२० कारणे

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

डाग हेवार्द-मिल्स अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, त्यात उत्कृष्ठ म्हणजे ‘’प्रामाणीकपणा आणि अप्रामाणीकपणा.’’ दोन हजार मंडळयांचा पंथ ज्याला द लाईटहाउस चापेल आंतरराष्ट्रीय असे म्हंटले जाते त्याचे ते संस्थापक आहेत. डाग हेवार्द-मिल्स, एक आंतरराष्ट्रीय सुवार्तिक, हे आंतरराष्ट्रीय येशूच्या आरोग्याच्या सभा आणि परिषदा ह्यात सेवा करतात. अधिक माहितीसाठी, www.daghewardmills.org ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

Languageमराठी
Release dateJun 20, 2018
ISBN9781641354349
त्यांना सांगा तुम्ही आत्मे जिंकणारा का व्हायला पाहिजे याची १२० कारणे
Author

Dag Heward-Mills

Bishop Dag Heward-Mills is a medical doctor by profession and the founder of the United Denominations Originating from the Lighthouse Group of Churches (UD-OLGC). The UD-OLGC comprises over three thousand churches pastored by seasoned ministers, groomed and trained in-house. Bishop Dag Heward-Mills oversees this charismatic group of denominations, which operates in over 90 different countries in Africa, Asia, Europe, the Caribbean, Australia, and North and South America. With a ministry spanning over thirty years, Dag Heward-Mills has authored several books with bestsellers including ‘The Art of Leadership’, ‘Loyalty and Disloyalty’, and ‘The Mega Church’. He is considered to be the largest publishing author in Africa, having had his books translated into over 52 languages with more than 40 million copies in print.

Related to त्यांना सांगा तुम्ही आत्मे जिंकणारा का व्हायला पाहिजे याची १२० कारणे

Related ebooks

Reviews for त्यांना सांगा तुम्ही आत्मे जिंकणारा का व्हायला पाहिजे याची १२० कारणे

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    त्यांना सांगा तुम्ही आत्मे जिंकणारा का व्हायला पाहिजे याची १२० कारणे - Dag Heward-Mills

    अध्याय १

    तुम्ही आत्मे जिंकणारा का व्हायला पाहिजे याची एकशेवीस कारणे

    १. तुम्ही आत्मे जिंकणारा व्हायला पाहिजे कारण ही महान आज्ञा, महान आदेश, उत्तम सूचना, महान हुकूम आहे जो आपल्या प्रभू आणि तारणहार येशू ख्रिस्त याने दिला आहे.

    तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, "स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा; त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.

    मत्तय २८:१८-२०

    २. तुम्ही आत्मे जिंकणारा व्हायला पाहिजे. कारण आपल्या सर्वांनी आत्मे जिंकण्याचे हे महान कार्य करण्यास बोलावले आहे.

    कारण बोलावलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडके आहेत.

    मत्तय २२: १४

    ह्याप्रमाणे शेवटले ते पहिले व पहिले ते शेवटले होतील. कारण बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत.

    मत्तय २०:१६

    विल्यम बूथने बोलावण्याबद्दल काय सांगितले

    "बोलावले नाही! असे तुम्ही  म्हणाला का?  मला असे वाटते तुम्ही असे म्हणावे, बोलावणे ऐकले नाही.

    आपले कान खाली पवित्रशास्त्रावर ठेवा आणि त्याला तुम्हांला आज्ञा देताना ऐका, पापी लोकांना पापांच्या आगीतून  बाहेर काढा ? ओझ्याने दबलेल्या, कष्टप्रद, आणि पिडीत हृदय  असलेली मानव जात जी मदतीसाठी दयनीय आक्रोश करत आहे तो ऐका!

    जा आणि नरकातल्या दरवाज्यांसमोर उभे राहा आणि  तेथील लोक तुम्हांला सांगत आहे की तुम्ही त्यांच्या वडिलांच्या घरी जावे आणि त्यांच्या भावांना, बहिणींना व नोकरांना व मालकांना येथे येण्यापासून परावृत्त करावे.

    मग ख्रिस्ताच्या चेहऱ्याकडे पाहा -  ज्याच्या आज्ञेचे तुम्ही पालन केले आहे - आणि तुम्ही त्याला सांगा की त्याची दया  या जगाला दाखवण्यासाठी तुम्ही  तुमचे हृदय आणि आत्मा आणि शरीर  आणि परिस्थिती सामील करत आहात की नाही?

    विल्यम बूथ, संस्थापक, साल्व्हेशन आर्मी

    माझा विश्वास आहे की प्रत्येक पिढीमध्ये देवाने पुरुष आणि स्त्रियांना पृथ्वीवरील सर्व अपरिचित जमातींना सुवार्ता सांगण्यासाठी बोलावले आहे. तो बोलावणार नाही असा देव नाही, तो बोलवतो, पण लोक त्याला प्रतिसाद  देत नाही.

    इसोबेल कुहान, चीन आणि थायलंड येथे मिशनरी

    ३. तुम्ही आत्मे जिंकणारा व्हायला पाहिजे; कारण तुम्ही आत्मे जिंकण्याच्या या  चांगल्या कार्यासाठी निर्माण केले गेले आहात.

    आपण सत्कृत्ये करावीत म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत; ती सत्कृत्ये आचरत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली.

    इफिस. २:१०

    लंडनमधील एका टॅक्सी चालकाशी एकदा गप्पा मारल्या. मी त्याला सांगितले की मी ख्रिस्ती आहे आणि त्याला ख्रिस्ताची महती  सांगू लागलो. मी त्याला स्वर्ग आणि नरकाच्या वास्तविकतेबद्दल सांगितले. तेव्हा तो हसला आणि त्याने विचारले की मी जे काही बोललो होतो त्यावर माझा विश्वास आहे का?

    तो म्हणाला, जर खरंच स्वर्ग आहे, तर ख्रिस्ती लोक स्वतःला मारून स्वर्गात का जात नाही?

    तो असे म्हणण्याचा प्रयत्न करीत होतो की जर स्वर्ग इतके सुंदर स्थान आहे आणि ख्रिस्ती लोकांना पृथ्वीवर काही करण्याची गरज नाही, तर त्यांनी स्वर्गात गेले पाहिजे.

    तसे पाहिले तर खरंच, ख्रिस्ती लोकांसाठी पृथ्वीवर करण्यासाठी काहीच नाही तर या माणसाकडे एक चांगला मुद्दा आहे. तथापि, वास्तविकता ही आहे की  ख्रिस्ती लोकांना स्वर्गात  जाण्यापूर्वी या पृथ्वीवर करण्यासाठी भरपूर काम आहे. आपण येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेचा प्रसार  करायचा आहे आणि उपदेश द्यायचा आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत हरवलेल्या आत्म्यांना जिंकायचे आहे.

    लाखो लोकांचे तारण आपल्यावर अवलंबून आहे. मला हे सांगण्यास  दुःख वाटते की, बहुतेक ख्रिस्ती लोकांना त्यांचे तारण कोणत्या कारणांसाठी झाले  आहे हे माहित नाही.

    पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की आपले एका कारणासाठी तारण झालेले आहे - सत्कृत्ये  करण्यासाठी!

    आपण सत्कृत्ये करावीत म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत; ती सत्कृत्ये आचरत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली.

    इफिस. २:१०

    ख्रिस्ती लोक आपल्या विश्वासापासून दररोज माघारी वळत आहेत; कारण त्यांच्याकडे मंडळीमध्ये जाण्यासाठी काहीच उद्देश राहिला नाही. लोक मंडळीत उपस्थित राहतात, परंतु काही काळानंतर ते बाहेर पडतात, मंडळीमधील जीवनाला काही अर्थ नाही असे त्यांना वाटते. जो कोणी आत्मे जिंकण्याच्या कार्यासाठी स्वत:ला वाहून घेईल तो आपल्या तारणाचे कारण शोधण्यास सुरवात करेल. आत्मे जिंकणे  ख्रिस्ती  लोकांचा आत्मविश्वास वाढतो.

    ४. तुम्ही आत्मेजिंकणारा व्हायला पाहिजे कारण आत्मे जिंकण्याच्या कार्यामुळे आपण खूप आनंदी आणि उत्साही ख्रिस्ती होवू शकतो.

    ह्यानंतर प्रभूने आणखी बहात्तर जणांना नेमून ज्या ज्या नगरात व ज्या ज्या ठिकाणी तो स्वत: जाणार होता तेथे दोघे-दोघे असे त्यांना आपल्यापुढे पाठवले. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, "पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत; ह्यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावेत म्हणून त्याची प्रार्थना करा. आता जा; पाहा, लांडग्यांमध्ये कोकरे तसे तुम्हांला मी पाठवत आहे. 

    नंतर ते बहात्तर जण आनंदाने परत येऊन म्हणाले, प्रभूजी, आपल्या नावाने भुतेदेखील आम्हांला वश होतात.

    लूक १०:१-३,१७

    जेव्हा केव्हा  तुम्ही सुवार्ता प्रचार करण्यासाठी बाहेर जाता तेव्हा तुम्ही आनंदाने परत येता. आत्मे जिंकले गेल्यास त्यात आनंद असतो. मी हे स्पष्ट करू शकत नाही. केवळ आईच सांगू शकते की मुलाच्या जन्मानंतर तिला कसे वाटते. मी अनेक स्त्रियांना अत्यंत तीव्र प्रसूती वेदना  भोगताना  पहिले आहे, पण वेदना असो  अथवा  संघर्ष असो त्यांना आनंदापासून काहीच दूर ठेवू शकत नाही.

    जेव्हा तुम्ही लोकांना प्रभूकडे घेऊन येता, तेव्हा तुम्हाला कळेल की  प्रभूचा आनंद असणे म्हणजे काय असते. मी तुम्हाला ते स्पष्ट करून सांगू शकत नाही. तो आनंद तुम्हाला स्वत: शोधावा लागेल.  मी माझ्या मंडळीतील  सदस्यांमध्ये पाहिले आहे की जेव्हा ते आत्मे जिंकण्याच्या कार्यात सहभागी होतात तेव्हा ते उत्साही  होतात. आत्मे जिंकणे  प्रभूचा आनंद मंडळीत मोकळा करते

    ५. तुम्ही आत्मे  जिंकणारा व्हायला पाहिजे कारण कोणत्याही मंडळीची खरी महानता ही मंडळीत किती लोक बसलेले आहेत ही नसून; मंडळीमधून किती लोकांना बाहेर पाठविले आहे त्यात आहे.

    ६. तुम्ही  आत्मा  जिंकणारा व्हायला पाहिजे; कारण आत्मे जिंकणे ही येशूच्या हृदयाची कंपने आहेत.

    काही वर्षांपूर्वी, मला दृष्टांत झाला. या दृष्टान्तात मला रक्ताने माखलेले एक मानवी हृदय दिसले. हृदय धडधडत होते. त्या दिवशी देवाने माझ्या मनावर बिंबित केले की येशू ख्रिस्ताचे हृदय कापणीच्या शेतासाठी आक्रोश करत आहे. येशूने त्याचे सिंहासन व्यर्थ सोडले नाही! तो पाप्यांना वाचवण्यासाठी या जगात आला.

    कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यास व तारण्यास आला आहे.

    लूक १९:१०

    ७. तुम्ही आत्मे जिंकणारा व्हायला पाहिजे. कारण आत्मे जिंकणे मंडळीला विभक्त होण्यापासून रोखते.

    जेव्हा तुमच्या मंडळीमधील सदस्य फलदायी कार्यात गुंतलेले असतील, तेव्हा त्यांच्याकडे विभाजन करणा-या लहानशा भांडणांसाठी वेळ नसणार. पाळकांनी त्यांच्या मंडळीतील सदस्यांना शिकवले पाहिजे की आत्मा हा आत्मा आहे आणि देवासाठी तो अत्यंत मौल्यवान आहे.

    जेव्हा मंडळीच्या सदस्यांना आत्म्याचे महत्व कळते आणि ते  जिंकण्याची गरज आहे याची जाणीव होते,तेव्हा त्यांची प्राथमिकता ही पवित्र शास्त्रासंबंधी अग्रक्रम बनते.

    मंडळी विभाजन आणि विभाग टाळले जातात. जेव्हा बरेच ख्रिस्ती लोक काहीच न करता एकाच ठिकाणी असतात तेव्हा त्रास होतो, भांडणे होतात आणि जखमा होतात.

    ८. तुम्ही आत्मे जिंकणारा व्हायला पाहिजे आणि कारण आत्मे जिंकणे दैवी आधार आणि संरक्षण निर्माण करते.

    सुवार्ता प्रसार करायचा किंवा नाही हे आपल्या निवडीत नाही. जर आपण तसे केले नाही, तर आपलेच मरण आहे.

        पीटर टेलर फोर्स्थ

    जेव्हा तुम्ही आत्मे जिंकता तेव्हा तुम्ही जे काही करत आहात त्यासाठी दैवी समर्थन निर्माण करता.

    तुम्ही पवित्र शास्त्र वाचल्यास तुम्हांला आढळून येईल की, आत्मे जिंकल्यामुळे स्वर्गीय आनंद निर्माण होतो. प्रभूसाठी जिंकलेल्या प्रत्येक आत्म्यासाठी स्वर्गीय प्रतिसाद आहे.

    त्याप्रमाणे ज्यांना पश्चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हांला सांगतो.

    त्याप्रमाणे, पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो, हे मी तुम्हांला सांगतो.

    लूक १५: ७, १०

    मंडळ्यांना त्या एका कामासाठी अस्तित्वात आहेत हे माहीत असायला हवे: स्वर्गासाठी आत्मे निर्माण करणे. दूतावास ते ज्या सरकारकडून असतात त्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अस्तित्वात असतात. त्याचप्रमाणे, मंडळ्या स्वर्गीय  दूतावास आहेत.

    बरेच लोक अशी प्रार्थना करतात की, देवाने त्यांना वाईटापासून दूर ठेवावे. देवाची इच्छा पूर्ण करण्यात भाग घेणाऱ्या सर्वांसाठी देवाचे संरक्षण उपलब्ध आहे हे तुम्हाला माहित आहे का?

    स्तोत्र ९१ मध्ये म्हटले आहे की,माझ्यावर त्याचे प्रेम आहे, म्हणून मी त्याला मुक्त करीन आणि त्याला सुरक्षित ठेवीन.

    माझ्यावर त्याचे प्रेम आहे, म्हणून मी त्याला मुक्त करीन; त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवीन. तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन; संकटसमयी मी त्याच्याजवळ राहीन; मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन; त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन; त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन.

    स्तोत्र. ९१:१४-१६ 

    जेव्हा तुम्ही देवाला संतुष्ट करण्यासाठी देवावर आपले प्रेम व्यक्त करता, देव तुम्हाला सांगतो की, तो तुम्हाला मुक्त करेल. मला वाटते की मी देवाच्या इच्छेनुसार काम करत आहे. कदाचित हेच त्याचे एकमेव कारण आहे की, मी अजूनही जिवंत आहे. पौलाप्रमाणेच, मलाही काही मृत्यूच्या जवळ गेल्याचे अनुभव आले आहेत, विमान कोसळण्यापासून वाचलो आणि कार अपघातापासून वाचलो याचा त्यात समावेश आहे.

    ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे (हे मी वेडगळासारखे बोलतो); श्रम करण्यात, कैद सोसण्यात, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे व पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत पडल्यामुळे मी अधिक आहे. पाच वेळा मी यहूद्यांच्या हातून एकोणचाळीस फटके खाल्ले. तीन वेळा छड्यांचा मार खाल्ला. एकदा मला दगडमार झाला; तीन वेळा माझे गलबत फुटले व एक दिवस व एक रात्र मी समुद्रात घालवली;

    २ करिंथ ११:२३-२५ 

    या सर्व गोष्टींमध्ये मी पौलाप्रमाणे म्हणू शकतो की देवाने मला त्या सर्वामधून मला वाचवले.

    कारण माझी खातरी आहे की, मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमानकाळच्या गोष्टी, भविष्यकाळच्या गोष्टी, बले, उंची, खोली, किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करायला समर्थ होणार नाही.

    रोम. ८:३८-३९

    मी आता पाहत आहे की, देव तुम्हाला मुक्त करत आहे! मी आता पाहत आहे की, तुमच्या समस्येच्या वेळी देव तुम्हाला मदत करीत आहे! मी आता पाहत आहे की,  देव तुमच्याबरोबर उभा आहे. कारण तुम्ही त्याच्यावर प्रीति केली आहे.

    तुम्हाला देवाच्या इच्छेमध्ये राहायचे आहे का? तुम्हांला तुमची मंडळी वाढावी असे वाटते का? त्यासाठी आजच आत्मा जिंकणारा व्हा. तुम्ही तुमच्या मंडळीमध्ये एक प्रकारचा फरक अनुभवाल.

    माझ्या पाळकीय कामात पूर्णता मी फक्त तेव्हाच पाहू शकतो जेव्हा, मी एखाद्या मंडळीतील सदस्याला सेवक बनण्यास सक्षम करतो. मला माझ्या मंडळीमधील प्रत्येक सदस्याला एक आत्मा  जिंकणारा बनवायचे आहे. एक दिवस  दाखवण्यासाठी त्यांच्याकडे फळ असावे  अशी माझी इच्छा आहे. आणि जर आत्म्यांची कापणीच नसेल, तर पाळकांकडे सांभाळण्यासाठी मेंढरेच नसतील. प्रत्येक पाळक  सुवार्तिकाचे काम करू शकतात.

    ९. तुम्ही आत्मे जिंकणारा व्हायला पाहिजे कारण आत्मा  जिंकणारा झाल्याने तुम्हांला एकाच नाण्याला  वारंवार  चमकावण्यापासून  रोखते.

    तसेच अशी कोण स्त्री आहे की, तिच्याजवळ रूप्याची दहा नाणी असता त्यांतून एक नाणे हरवले तर दिवा पेटवून व घर झाडून ते सापडेपर्यंत मन लावून शोध करत राहत नाही? 

    ते सापडल्यावर ती मैत्रिणींना

    Enjoying the preview?
    Page 1 of 1