Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

प्रभूची सेवा करणे ही उत्तम गोष्ट आहे
प्रभूची सेवा करणे ही उत्तम गोष्ट आहे
प्रभूची सेवा करणे ही उत्तम गोष्ट आहे
Ebook148 pages57 minutes

प्रभूची सेवा करणे ही उत्तम गोष्ट आहे

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

डाग हेवार्द-मिल्स, एक आंतरराष्ट्रीय सुवार्तिक, हे आंतरराष्ट्रीय येशूच्या आरोग्याच्या सभा आणि परिषदा ह्यात सेवा करतात. अधिक माहितीसाठी, www.daghewardmills.org ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

Languageमराठी
Release dateJun 20, 2018
ISBN9781641354653
प्रभूची सेवा करणे ही उत्तम गोष्ट आहे
Author

Dag Heward-Mills

Bishop Dag Heward-Mills is a medical doctor by profession and the founder of the United Denominations Originating from the Lighthouse Group of Churches (UD-OLGC). The UD-OLGC comprises over three thousand churches pastored by seasoned ministers, groomed and trained in-house. Bishop Dag Heward-Mills oversees this charismatic group of denominations, which operates in over 90 different countries in Africa, Asia, Europe, the Caribbean, Australia, and North and South America. With a ministry spanning over thirty years, Dag Heward-Mills has authored several books with bestsellers including ‘The Art of Leadership’, ‘Loyalty and Disloyalty’, and ‘The Mega Church’. He is considered to be the largest publishing author in Africa, having had his books translated into over 52 languages with more than 40 million copies in print.

Related to प्रभूची सेवा करणे ही उत्तम गोष्ट आहे

Related ebooks

Reviews for प्रभूची सेवा करणे ही उत्तम गोष्ट आहे

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    प्रभूची सेवा करणे ही उत्तम गोष्ट आहे - Dag Heward-Mills

    अध्याय १

    सेवक कोण आहे?

    देवाचा सेवक होण्यासाठी तुम्हांला पाळक किंवा सेवाकार्य करणारे होण्याची गरज नाही. याजक, संदेष्टे, सुवार्तिक आणि पाळक हे सर्व देवाचे सेवक आहेत हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. अशा लोकांना परात्पर देवाचे सेवक म्हणून संबोधण्याचा विशेषाधिकार प्राप्त आहे हे आपल्याला ठाऊक आहे. त्यांच्या कर्त्याची सेवा करण्याचा हा त्यांना केवढा मोठा आशीर्वाद प्राप्त आहे. तथापि, चांगली बातमी ही आहे की इतर लोक जे येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेचे सेवक नाहीत ते सुद्धा देवाचे सेवक होऊ शकतात.

    खरेच, पवित्र शास्त्र हे अशा लोकांच्या कथेने भरलेले आहे जे पाळक नव्हते परंतु देवाचे सेवक होते. देवाने त्यांना त्याचे सेवक म्हणून म्हटले होते आणि ते तसे होतेच. यातील कांही लोक राजे, राजकारणी, व्यावसायिक, करोडपती, शेतकरी आणि गैर-यहूदी सुद्धा होते. 

    खर पाहिल्यास, याजक आणि सुवार्तिक ह्यांच्या व्यतिरिक्त ज्या लोकांना देवाचे सेवक म्हणून संबोधले गेले होते प्रत्येकासाठी ते परिणामकारी होते. ह्याचा अर्थ तुम्ही देवाचे सेवक होऊ शकता ! पेढीचा मालक (बँकर), डॉक्टर, राजकारणी, औषध विक्रेता (फार्मासिस्ट), जकातदार, हे सर्व देवाचे सेवक होऊ शकतात. 

    देवाचे सेवक होण्यासाठी तुम्हांला संपूर्ण-वेळ सेवेमध्ये असण्याची आवश्यकता नाही. तुम्ही कोणत्याही जगिक क्षेत्रांत काम करून देवाचे सेवक होऊ शकता. देवाने ज्या लोकांचा उल्लेख त्याचे सेवक म्हणून केला आहे त्यांच्या बाबतीत लक्ष देणे महत्वाचे आहे.

    जो दुस-याची इच्छा पूर्ण करतो तो सेवक आहे. सेवक तो आहे जो दुस-याच्या आवडीनुसार काम करतो. आतापासून तुम्ही स्वत:ला देवाचे एक गुणकारी सेवक म्हणून मानू लागा. एक विद्यार्थी देवाचा सेवक होऊ शकतो ! एक व्यावसायिक देवाचा सेवक होऊ शकतो ! एक शिक्षक देवाचा सेवक होऊ शकतो ! तुमचे कसलेहि काम असो, तुम्ही सर्वशक्तिमान देवाची इच्छा पूर्ण करू शकता. देवाचे सेवक होणे हे सर्वांत मोठे काम तुम्ही कधीहि करू शकता.

    याजक, लेवी, आणि संदेष्टे ह्यांना देवाचे सेवक म्हटले आहे ह्यांत कांही आश्चर्य नाही. अब्राहाम, इसहाक, आणि योकोब हे पाळक नव्हते परंतु ते देवाचे सेवक होते असा देवाने त्यांचा उल्लेख केला आहे. अब्राहाम हा पाळक होता असे तुम्हाला म्हणायला आवडेल हे मला माहित आहे. परंतु अब्राहाम पाळक नव्हता. तो केवळ एक देवाचा सेवक होता. मोशेला देखील पाळक म्हणावेसे तुम्हांला आवडेल हे देखील मला माहित आहे. तथापि, मोशे हा इस्राएल राज्याचा प्रमुख होता. देवाने दावीद राजाचा त्याचा सेवक म्हणून उल्लेख केला आहे. खर पाहिल्यांस, मोशे आणि दावीद हे इस्राएल राज्याचे प्रमुख आणि डेव्हिड बेन गुरीयन, शिमोन पेरेस, यित्झाक राबिन, एहूद बराक, अरीएल शेरोन, आणि बेंजामिन नेतानयाहू ह्या लोकांचे पूर्ववर्ती (पूर्वज) होते. राज्याचा प्रमुख हा पाळक नसतो. राज्याचा प्रमुख देवाचा सेवक होऊ शकतो. मोशे आणि दावीद हे दोघेहि देवाचे अद्भुत सेवक होते. तुम्ही कोणत्याहि हुद्यावर असा ह्याची खात्री करा, की तुम्ही देवाचे सेवक व्हाल.

    ईयोब हा पूर्व दिशेचा एक महान उद्योगपती होता. ईयोब पूर्वकडील असल्यामुळे, कदाचित तो चिनी, कोरियन किंवा जपानी असावा. तो अतिशय श्रीमंत होता तरीहि त्याला देवाचा सेवक म्हणून म्हटले गेले. देवाने सैतानाजवळ सुद्धा त्याचा सेवक ईयोब ह्याबद्दल अभिमानाने सांगितले होते. स्वर्गाच्या दृष्टीकोनातून, ईयोब हा देवाचा सेवक होता. आज, श्रीमंत उद्योगपती क्वचितच प्रभूची सेवा करतात. जर तुम्ही एक उद्योगपती आहांत, तर ईयोबासारखे होऊन देवाचे सेवक होऊ शकता. तुम्ही देवाचे सेवक व्हावे म्हणून हे पुस्तकं लिहिण्यांत आले आहे. तुम्ही देवाचे सेवक व्हावे अशी त्याची तुमच्यासाठी इच्छा आहे. तुम्ही देवाचे सेवक व्हावे असा मी तुम्हांला सल्ला देतो. देवाचे सेवक होण्याचे अनेक लाभ आहेत. आणि हे पुस्तकं ह्याबद्दलच आहे! देवाचे सेवक होण्याचा निर्णय घ्या. निर्णय घ्या की तुम्हांला देवाचा एक सेवक म्हणून म्हटले जाईल. देवाचा एक सेवक म्हणून स्वर्गाला तुम्हांस सन्मान आणि आदर करू द्या. पवित्र शास्त्रात ज्यांना देवाचे सेवक म्हटले आहे अशा लोकांची अद्भुत यादी बघू या.

    १. याजक आणि लेवी हे देवाचे सेवक होते. 

    पहा, देवाच्या मंदिराच्या सेवेसाठी याजक व लेवी यांचा कार्यक्रम नेमून दिला आहे आणि सर्व प्रकारची सेवा करण्यासाठी हरप्रकारचे काम मनापासून करणारे कुशल पुरुषहि तुझ्यापाशी असणार’ याप्रमाणेच सरदार लोक व सर्व प्रजाजन हे सर्वस्वी तुझ्या हुकुमांत असणार. 

    १ इतिहास २८:२१

    २. संदेष्टे देवाचे सेवक होते. 

    ईजबेलीच्या हातून माझे सेवक जे संदेष्टे आणि परमेश्वराचे दुसरे सर्व सेवक यांचा रक्तपात झाला आहे त्याचा मला सूड घेणे आहे, म्हणून आपला धनी अहाब याच्या घराण्याचा तू संहार कर. 

    २ राजे ९:७

    असे असता माझे सेवक म्हणजे संदेष्टे यांस जी वचनें व नियम मी आज्ञापिले होते त्यांनी  तुमच्या पूर्वजांस गांठिले नाही काय? तेंव्हा त्यांनी वळून म्हटले, आमचा आचार व कर्में याप्रमाणे आमचे करण्याचा सेनाधीश परमेश्वराचा मानस होता, त्याचप्रमाणे त्याने आमचे केले आहे.

    जख-या १:६

    ३. अब्राहाम, इसहाक, आणि याकोब, हे महान उद्योगपती होते, ते सर्व देवाचे सेवक होते. 

    तुझे दास (सेवक) अब्राहाम, इसहाक, व इस्राएल ह्यांची आठवण कर; तू  त्यांना स्वत:ची शपथ वाहून सांगितले होते की, मी तुमची संतती आकाशांतील ता-यांसारखी बहुगुणीत करीन, आणि ज्या ह्या देशाविषयी मी तुम्हांस सांगितले तो सगळा तुमच्या संततीला देईन आणि ती त्याची निरंतरची वतनदार होईल. 

    निर्गम ३२:१३

    ४. याकोब, जो अब्जाधीश, तो देवाचा सेवक होता.  

    माझ्या सेवका, इस्राएला, माझ्या निवडलेल्या याकोबा, माझा मित्र अब्राहम याच्या संताना, मी तुला हाती धरून पृथ्वीच्या दिगंतांपासून आणिले, तिच्या सीमांपासून बोलावून तुला म्हटले; तू माझा सेवक आहेस, मी तुला निवडिले आहे, तुझा त्याग केला नाही.

    यशया ४१:८, ९

    ५. मोशे, जो राज्याचा प्रमुख होता, तो देवाचा सेवक होता.

    मात्र तू खंबीर हो, व खूप हिंमत

    Enjoying the preview?
    Page 1 of 1