Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

विजय रहस्य
विजय रहस्य
विजय रहस्य
Ebook394 pages2 hours

विजय रहस्य

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

प्रत्येकासाठी जीवन हे आव्हानात्मक असू शकते. अनेकदा जे काही तुमच्या समोर येते त्याचा ज्ञानाने सामना केला पाहिजे. ज्ञान देवाचे असे गूपित आहे जे तुम्हाला तुमच्या संघर्षांच्या वर होउन चांगले जीवन जगण्यास मदत करते. देवाने तुम्हाला गौरवा करिता नेमले आहे. देवाचे गूपित म्हणजे देवाचे ज्ञान आणि ते तुमचे गौरव व सुंदरता हयासाठी नेमलेले आहे. हया पुस्तकातील प्रकटीकरणं तुम्हाला दररोज विजय मिळवून देवो! हे पुस्तक तुम्हाला विजयी होण्याचे ज्ञान देवो!

Languageमराठी
Release dateJun 20, 2018
ISBN9781641354615
विजय रहस्य
Author

Dag Heward-Mills

Bishop Dag Heward-Mills is a medical doctor by profession and the founder of the United Denominations Originating from the Lighthouse Group of Churches (UD-OLGC). The UD-OLGC comprises over three thousand churches pastored by seasoned ministers, groomed and trained in-house. Bishop Dag Heward-Mills oversees this charismatic group of denominations, which operates in over 90 different countries in Africa, Asia, Europe, the Caribbean, Australia, and North and South America. With a ministry spanning over thirty years, Dag Heward-Mills has authored several books with bestsellers including ‘The Art of Leadership’, ‘Loyalty and Disloyalty’, and ‘The Mega Church’. He is considered to be the largest publishing author in Africa, having had his books translated into over 52 languages with more than 40 million copies in print.

Related to विजय रहस्य

Related ebooks

Reviews for विजय रहस्य

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    विजय रहस्य - Dag Heward-Mills

    विजय रहस्य क्रमांक 1

    विजय रहस्य काय आहे?

    देवाचे अंतस्थ रहस्य तुला कळले आहे काय? अकलेचा मक्ता तूंच घेतला आहे काय

    ईयोब 15:8

    विजयाचे रहस्य असे रहस्य आहे जे तुम्हाला जिवंत आश्चर्य बनवेल! विजय रहस्य देवाचे रहस्य आहे! 

    तुम्ही देवाच्या रहस्याविषयी ऐकले आहे काय? तुम्ही देवाचे रहस्य वाचले आहे काय? देवाच्या रहस्यासमोर तुम्ही उघडकीस आला आहात काय? देवाचे झाकलेले ज्ञान हे देवाचे रहस्य आहे! तुम्हाला देवाचे ज्ञान प्राप्त झाले आहे काय? तुम्हाला वरून प्रगटीकरण मिळाले आहे काय? जर तुम्ही देवाचे रहस्य ऐकलेले नाही तर तुम्हाला ज्याची गरज आहे तेच तुम्ही गमावून बसला आहात. देवाचे गुपित हे देवाचे ज्ञान आहे जे तुमच्या गौरवासाठी आणि सौंदर्यासाठी अभिशिक्त करण्यात आले आहे. 

    तर देवाचे गुढ ज्ञान आम्ही सांगतो; ते गुप्त ठेवलेले होते, ते देवाने युगाच्या पूर्वी तुमच्या आमच्या गौरवाकरिता नेमले होते;

    1 करिंथ 2:7

    तुम्हाला ज्याची गरज आहे ते जगिक ज्ञान नाही. जगिक ज्ञान हे अर्थशास्त्र, कायदा, गणित, विज्ञान, जमाखर्च इत्यादि यार्चे शिक्षण आहे. हे सर्व लौकीक शिक्षण चांगले आहे परंतु ते जगिक मानवी ज्ञान आहे. या सर्व गोष्टींना स्थान आहे. परंतु या गोष्टींना मंडळीत स्थान नाही. ‘‘माझे भाषण व माझी घोषणा ज्ञानयुक्त अशा मन वळविणा-या शब्दांची नव्हती तर आत्मा व सामथ्र्य ह्यांची निदर्षक होती...’’ (1 करिंथ 2:4). देवापासून येणारे ज्ञान हे फार महान आहे. देवाच्या ज्ञानामध्ये देवाच्या रहस्याचा समावेश असतो. तर देवाचे गुढ ज्ञान आम्ही सांगतो; ते गुप्त ठेवलेले होते, ते देवाने युगाच्या पूर्वी तुमच्या आमच्या गौरवाकरिता नेमले होते; (2 करिंथ 3:7). तुम्हाला वैभवशाली आणि जीवंत आश्चर्य बनविण्यासाठी या ज्ञानाचा अभिषेक करण्यात आला आहे. 

    देवाच्या आश्चर्यजनक रहस्यांचा शोध घेण्याचे कोणते लाभ आहेत याकडे पाहू या. 

    तुम्ही देवाचे गुपित जाणून घ्यावे याची सहा कारणे

    1. देवाच्या गुपिताच्या शोधावर तुमचे जीवन आणि मरण अवलंबून आहे.

    ‘‘तेव्हा राजाने म्हटले, मला खात्रीने वाटते की तुम्ही वेळ काढीत आहा, कारण तुम्हास ठाऊक आहे की, माझा ठराव होऊन चुकला आहे. तुम्ही मला स्वप्न सांगणार नाही तर तुमच्या संबंधाने एकच हुकूम होणार; हा प्रसंग टाळावा म्हणून तुम्ही खोटयानाटया गोष्टी सांगावयाचा बेत केला आहे. माझे स्वप्न मला सांगा म्हणजे त्याचा अर्थ तुम्हास सांगता येईल किंवा नाही हे मला कळेल; खास्द्यांनी राजास उत्तर केले, महाराजांची ही गोष्ट सांगेल असा कोणी मनुष्य सा-या दुनियेत नाही; असली गोष्ट ज्योतिश्यास, मांत्रिकांस किंवा खास्द्यास कोणाहि थोर व पराक्रमी राजाने आजपर्यंत विचारली नाही. महाराज जी गोष्ट विचारीत आहेत ती दुर्घट आहे; मानवांत वास न करणा-या देवाशिवाय कोणाच्याने ती महाराजांच्या हुजूरास सांगवणार नाही. हे ऐकून राजा क्रोधाने संतप्त झाला आणि बाबेलाच्या सर्व ज्ञान्यांचा वध करावा अशी त्याने आज्ञा केली. ज्ञान्यांचा वध करावा हा हुकूम सुटला, तेव्हा दानीएलाचा व त्याच्या सोबत्यांचा वध करावा म्हणून लोक त्यांस शोधू लागले.’’

    मग दानिएलाने राजाकडे जाऊन विनंती केली की, मला अवकाश द्यावा म्हणजे मी हुजूरांस स्वप्नाचा अर्थ सांगेल. यावर दानीएलाने आपल्या घरी जाऊन हनन्या, मीषाएल व अज-या यांस ही हकीकत कळविली. आणि बाबेलच्या इत्तर ज्ञान्यांबरोबर आपला व आपल्या सोबत्यांचा घात होऊ नये म्हणून दानीएलाने त्यास विनंती केली की या रहस्यासंबंधाने स्वर्गीय देवाने आपणावर दया करावी असे त्याजजवळ मागावे. मग रात्री दृ्रष्टांतात हे रहस्य दानीएलास प्रगट झाले; त्यावरून दानीएलाने स्वर्गीय देवाचा धन्यवाद केला. दानीएल म्हणाला, देवाचे नाम युगानुयुग धन्यवादित असो; कारण ज्ञान व बल ही त्याचीच आहेत; तोच प्रसंग व समय बदलतो, तो राजास स्थानापन्न अथवा स्थानभ्रष्ट करितो; तो ज्ञान्यास ज्ञान देतो व बुध्दिमानांस बुध्दि देतो. तो गहन व गूढ गोष्टी प्रगट करितो, अंधारात काय आहे हे त्याला ठाऊक असते; त्याच्याजवळ प्रकाश वसतो.’’

    दानीएल 2:8-13, 16-22

    दानीएल आणि त्याचे सोबती वध होण्याच्या मोठया संकटात होते. मृत्यू त्यांच्या तोंडासमोर आ वासून उभा होता. राजाला माहित होते की जास्तीत जास्त ज्ञानी माणसे, खगोलशास्त्रज्ञ, आणि जादूगार हे ढोंगी होते आणि फसवेगिरीने भरलेले होते. आपला महाल अशा तोतया लोकांपासून शुध्द करावा असे  नबूखद्नेसर राजाला निकराने वाटत होते. राजाने दिलेल्या परीक्षेमुळे केवळ खरे ज्ञानी लोक त्याचे सल्लागार म्हणून महालात राहणार होते. चांगले सल्लागार होण्यासाठी, तुम्हाला काही रहस्ये माहित असणे गरजेचे असते. प्रत्येक महान उपलब्धीमागे आणि प्रत्येक महान व्यक्तीच्या मागे रहस्ये असतात. 

    बरेचदा, व्यक्ती कशााने महान बनली आहे याबाबत आपण चुकीचे अंदाज बनवितो. जास्तीत जास्त वेळेला एखाद्याच्या मोठेपणामागील रहस्याची आपल्याला माहिती नसते. काही गुपिते समजून घेतल्यामुळे तुमचा नाश होणे टळेल. ज्ञानाचा आत्मा हा देवाचा आत्मा सुध्दा आहे. ‘‘....कारण शत्रु पाण्याच्या लोंढयासारखा येईल तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याजविरूध्द झेंडा उभारील.’’(यशया 59:19). जेव्हा शत्रु तुम्हाला मारण्यासाठी येतो तेव्हा तेव्हा ज्ञानाचा आत्मा त्याच्याविरूध्द ध्वज उभारतो. ‘ध्वज’’ हा इब्री ‘‘नस’’ दाने असा शब्द आहे ज्याचा अर्थ आहे नाहीसे करण्यास भाग पाडणे. जव बंनेम जव कपेंचचमंतण् ज्ञानाद्वारे काही गोष्टी नाहीशा होतात. वर्षापूर्वी ज्यांना मलेरिया, अस्थमा, उच्च रक्तदाब किंवा मधूमेह होत होता ते त्या आजाराने मरण पावत होते. ज्ञानाद्वारे हे आजार ‘नाहीसे’’ आणि प्रभावहिन झाले आहेत. 

    काही गुपितांच्या ज्ञानावर तुमचे जीवन आणि मरण अवलंबून राहील. काही गुपिते आहेत जी तुमच्या जीवनासाठी फार महत्वाची आहेत. ज्यांना देवाची गुपिते  समजण्याचा आशीर्वाद मिळाला आहे त्यांना माहित आहे की काही गुपितांच्या ज्ञानावर जीवन आणि मरण अवलंबून आहे. यामुळेच तुम्ही देवाचे प्रगटीकरण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुमच्या गुपितांच्या ज्ञानामुळे तुम्ही वरचढ ठराल. विज्ञान, औषधी, खगोलशास्त्र, शेतीविज्ञान, तंत्रज्ञान आणि भौतिकशास्त्राची प्रगती ही शोघ घेण्यात आलेल्या गुपितांवर अवलंबून आहेत. ही रहस्ये वस्तुस्थिती आहेत जी हजारो वर्षांपासून अस्तित्वात होती. शास्त्रज्ञ हे मुलतः रहस्यांचा शोघ लावणारे आहेत. माझ्यासाठी ‘‘ई’’ म्हणजे नेहमीच बरोबर आहे. आईनस्टाईन हे केवळ रहस्य शोधक होते ज्यांनी हजारो वर्षापासून अस्वित्वात असलेल्या गुपितांचा  शोध लावला. 

    विजय गुपित हे प्रगटीकरण आहे ज्यामुळे तुम्हाला विजय मिळतो! विजय गुपिते ही पवित्र आत्म्याचे प्रगटीकरण आहे ज्यामुळे तुमच्या जीवनाच्या कामात आणि सेवेमध्ये फरक पडतो. नेहमी, थोडेसे ज्ञान हा जीवन आणि मरणातील फरक असतो. देव तुम्हाला आज ज्ञान देउ शकतो! देव तुम्हाला थोडेसे गुपित समजावून सांगू शकतो, ज्यामुळे तुमच्या जीवनात आणि सेवेत सारेकाही बदलेल. काही लोक या ज्ञानाच्या छोटया चाव्यांना ‘‘प्रगटीकरण’’ असे म्हणतात. तुम्ही त्याला काहीहि म्हणा, ही विजयाची गुपिते तुम्हाला मोठया विजयाकडे आणि पराक्रमाकडे नेतील. 

    विजय गुपितांच्या  परिणामाची पुष्ळक उदाहरणे इतिहासाच्या पुस्तकात सापडतील. चैदाव्या शतकात ‘‘प्लेग’’ नावाच्या रोगाने जगात प्रवेश केला आणि लाखो लोकांना गिळंकृत केले. पुष्कळ लोक मरण पावले आणि पुर्ण लोकसंख्या पुसली गेली. या रोगाची भिती पुष्कळ वर्षे कायम राहिली कारण जगाच्या वेगवेगळया भागामध्ये प्लेग डोके वर काढीत राहिला, लोकसंख्येला भयग्रस्त करीत राहीला आणि मोठया प्रमाणात लोकांच्या गटांना पुसून टाकीत राहिला. 

    खरोखर, जेव्हा 1347 मध्ये युरोपमध्ये प्लेग दाखल झाला तेव्हा प्राचीन युरोपच्या इतिहासात सर्वात वाईट संकटाचा अनुभव आला. या अति भयंकर प्लेगने युरोपची एक त्रृतिअंाश लोकसंख्या उलथून टाकली. काय आपण अशा रोगाची कल्पना करू शकता जो पुर्ण खंडात पसरतो आणि त्यांची एक त्रुतिआंश लोकसंख्या उखडून टाकतो? फार काय आधुनिक युगातहि, जेव्हा ईबोलाची साथ सियेरा लिओन, लिबेरिया आणि गुयानामध्ये पसरली, तेव्हा केवळ दहा हजार लोक मरण पावले. अशा आजाराची कल्पना करा जो लाखो लोकांना साफ करील आणि एखाद्या खंडाची पुर्ण लोकसंख्या रिकामी करील. 

    चढता ताप, अंतर्गत रक्तस्त्राव आणि त्यामुळे अंगावर आलेले काळे डाग आणि मोठाल्या ग्रंथी ही लक्षणे दिसणा-या रूग्णांची वाचण्याची शक्यता फारच कमी असायची. रोगाची लागण झालेली कोणताहि व्यक्ती तीन ते पाच दिवसात मरण पावत असे.

    त्या वेळेच्या डॉक्टरांना वाटत असे की हवामानातील आर्द्रता, कुजलेली मृत शरीरे आणि स्वच्छतेच्या अभावामुळे  खराब झालेल्या हवेमुळे प्लेग होतो. काही लोकांना असेहि वाटत होते की हा आजार यहूदी लोक पसरवित आहेत. चैदाव्या शतकातील डॉक्टराना हे माहित नव्हते की पिसवा आणि चिलटे वाहून नेत असलेल्या जीवाणूंमुळे प्लेग आजार होतो. औषधी शास्त्राला साध्या प्रतिजैविक औषधाची माहिती नव्हती! या आजाराचा प्रतिकार करण्याचा त्यांच्याकडे कोणताहि मार्ग नव्हता. प्रतिजैविक ज्ञानाचे रहस्य त्यांना कळले असते तर लाखो लोकांची मरणातून सुटका झाली असती.

    1877 मध्ये लूईस पॅश्चर आणि रोबर्ट कोच यांच्या लक्षात आले की हवेत संचार करणा-या बॅसीलस मध्ये दुसरा एक बॅक्टेरिया बॅसिलस अ्र्रथ्रासिस याची वाढ होत आहे. या महत्वाच्या शोधाचे रूपांतर अंटीबीओसिस या औषधीच्या निर्मीतीत झाले. खरे तर 1942 मध्ये जे औषध अषाप्रकारे काम करित होते त्याला सरतेशेवेटि मायक्रोबायोलोजिस्ट, सिमन वाक्समन यांनी अॅंटिबायोटिक्स असे नाव दिले. 

    हे प्रतिजैविक रहस्य चैदाव्या शतकात गैरहजर होते! या रहस्यामुळे चैदाव्या शतकात आलेल्या अतिभयंकर अशा प्लेगच्या साथीने मरण पावलेल्या लाखो लोकांचे प्राण वाचले असते. स्ट्रेप्टोमायसीन, जेंटामायसीन, आणि सिप्रोफ्लॅक्सॅसिन अशा साध्या औषधामुळे तो आजार रस्त्यातच थांबला असता. आज, भयंकर अशा प्लेगमुळे मरण्याचा घोका जवळ जवळ शुन्य आहे. 

    जर आपल्याकडे प्रतिजैविकतेचे रहस्य असते तर एकहि मनुष्य भयंकर अशा प्लेगने मरण पावला नसता. विजय रहस्ये मोठया प्रमाणात जीवने बदलून टाकतात. विजय रहस्ये पुष्कळ जीवने वाचवितात. विजयी रहस्ये सर्वकाही बदलून टाकते. 

    तुमच्या जीवनातील एक महत्वाची प्रार्थना तुम्हाला प्रकटीकरणाचा आत्मा मिळावा अशी असली पाहिजे. विजयी रहस्यांसाठी प्रार्थना करा! वेळेवर मिळणा-या प्रकटीकरणासाठी आणि ज्ञानासाठी केलेल्या या प्रार्थनेने तुमच्या जीवनात फरक पडेल.

    2. तुम्हाला सापडलेल्या देवाच्या रहस्यावर तुमच्या जीवनातील भरभराट अवलंबून असते.

    ‘‘परमेष्वर म्हणतो, कोरेश माझा अभिषिक्त आहे; त्याच्यापुढे राष्ट्रे पादाक्रांत करण्यासाठी मी त्यांचा उजवा हात धरिला आहे; राजास आपल्या कमरा सोडावयास मी लावितो; त्याच्यापुढे दरवाजे उघडतील; वेशी बंद राहणार नाहीत, असे मी करितो. परमेश्वर त्याला म्हणतो, मी तुझ्यापुढे चालेन व उंचसखल असलेले सपाट करीन; मी पितळी दरवाजे फोडून त्याचे तुकडे करीन, लोखंडाचे अडसर मोडून टाकीन. तुला अंधारातील निधी व गुप्त स्थळी लपविलेले धन देईन, म्हणजे तुला समजेक की तुला तुझ्या नावाने हाक मारणारा मी परमेश्वर इस्त्राएलाचा देव आहे.’’

    यशया 45:1-3

    विजयी रहस्ये तुम्हाला भरभराटीकडे घेउन जातील. जास्तीत जास्त सुबत्ता नजरेतून लपलेली असते. जास्तीत जास्त खरी भरभराट ही नजरेपासून लपलेली असते. यामुळेच त्यांना ‘‘अंधारातील निधी’’ असे म्हटले आहे. या जगातील निधी मिळावा म्हणून तुम्हाला रहस्य उलगडणारे प्रकटीकरण मिळणे आवश्यक आहे जेणेकडून तुम्हाला लपलेली संपत्ती दिसेल.

    काही लोक धनवान का आहेत हे पुष्कळ लोकांसाठी एक रहस्यच आहे. भरभराट व्हावी म्हणून लोक पुष्कळ गोष्टी करतात, परंतु फार थोडयांना सुबत्तेचे गुपित प्राप्त होते. पैसा गुप्त जागी लपवून ठेवलेला असतो. काही गुपितांचे ज्ञान झाले नाही तर तुम्ही तुमच्या उरलेल्या जीवनात दारिद्रयातच राहाल. भरभराटीचे गुपित समजण्यासाठी आणि यश प्राप्तीसाठी तुम्हाला प्रकटीकरणाचा आत्मा मिळणे गरजेचे आहे. ख-या यशाच्या मागे असलेले गुपित जर आपल्याला समजले तर आपल्या सर्व अडचणींचा एकाएकी शेवट होईल. 

    तुम्हाला गुपिते समजून घेतली पाहिजे कारण महानता आणि भरभराट महत्वाची गुपिते समजण्यावर अवलंबून आहेत. ज्या लोकांनी कार, विमान, एलेक्ट्रोनिक पाटया(उदाहरणार्थ आय पॅड), टेलिफोन, टेलिव्हिजन यांचा शोघ लावला ते आपल्या जगातील कोटयाधीश लोक आहेत. पुष्ळक देशांना या गोष्टींचा वापर कसा करावा याचे गुपित माहित नाही ़ ज्यांना ही गुपिते समजली आहेत ते जगातील सर्वात जास्त श्रीमंत लोक झाले आहेत. भ्रमणध्वनीचा शेध लावणारे आणि टमाटे आणि संत्रीची कापणी करणा-यांमध्ये किती मोठा फरक आहे याचा विचार करा. नारळ किंवा काळी मिरीचे उत्पादन काढण्यासाठी तुम्हाला विशेश अशा गुपिताची गरज पडत नाही. परंतु टेलिव्हीजन वापरण्यासाठी तुम्हाला काही गुपिते माहित असणे आवश्यक असते. गुपिते माहित असलेले लोक महत्वाचे होतात. दानीएल केवळ जीवंत राहीला असे नाही तर तो शहराचा तीन क्रमांकाची महत्वाची व्यक्ती बनला आणि गळयात भरभराटीचे प्रतिक अशी सोन्याची साखळी त्याच्या गळयात घालण्यात आली. जेव्हा तुम्हाला प्रकटीकरणाच्या द्वारे देवाचे गुपित माहित होईल तेव्हा तुम्हीहि महत्वाचे व्हाल. तुम्ही सोन्याने मढविले जाल आणि तुम्हाला देवाचा प्रकटीकरणाचा आत्मा मिळेल.

    ‘‘तेव्हा बेलशस्सराने आज्ञा केल्यावरून त्यांनी दानीएलास जांभळया रंगाचा पोषाख लेवविला. त्याच्या गळयात सोन्याचा गोफ घातला व त्याच्यासंबधाने सर्वत्र द्वाही फिरविली की हा राज्यातील तिघा अधिपतीतला एक आहे.’’

    दानीएल 5:29

    3. देवाचे गुपित नीतीमान आणि त्याच्या संदेष्टयांना दिले जाते. 

    ‘‘कारण परमेष्वराला कुटिलांचा वीट आहे, पण सरळांबरोबर त्याचे रहस्य आहे.’’

    नीतीसुत्रे 3:32

    तुम्ही तुमचे गुपित सर्वांना सांगत नाही. देवाने आपली गुपिते सर्वांना सांगावी अशी तुम्ही अपेक्षा का धरता? ज्या लोकांना देवाने आपली गुपिते कळविली ते नीतीमान असे दिसून आले. जे दुष्ट आहेत त्यांच्यापासून देव आपली गुपिते रोखून ठेवतो आणि ती नीतीमानांना देतो.

    सेवक आपल्या धन्याच्या जवळ असतात आणि त्यांच्या अवतीभवती काम करतात. म्हणून ही काही विषेश गोष्ट नाही की त्यांना मालकाच्या पुष्कळ गोष्टी माहित असतात ज्या बाहेरच्या लोकांना माहित नसतात. देवाचे सेवक आणि देवाचा संदेष्टा होण्याचा आटोकाट प्रयत्न करा आणि मग तुम्हाला आश्चर्यकारक गुपिते समजतील याची शाश्वती आहे.

    ‘‘प्रभू परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे यांस कळविल्याशिवाय खरोखर काहीच करीत नाही.’’

    आमोस 3:7

    4. देवाच्या सेवकाला देवाचे गुपित त्याच्या जीवनातील विषेश अवस्थेत दिले जाते.

    पूर्वीचे मास मला प्राप्त होते, पूर्वीच्यासारखे माझे दिवस असते, तर किती बरे होते! त्या दिवसात देव माझे रक्षण करीत असे व त्याच्या तेजाने मी अंधकारात चालत असे; त्या काळी मी भर उमेदीत होतो; देवाचा समागम मला माझ्या डे-यात घडे.’’

    ईयोब 29:2-4

    आपल्या जीवनातील उमेदीत ईयोबाने यातील काही गुपीतांचा आनंद भोगला. ज्या दिवसांत देवाने त्याला गुपिते कळविली आणि प्रकटीकरण दिले त्याविषयी तो तळमळीने बोलतो. वस्तुस्थिती ही आहे की प्रकटीकरण नेहमीच येत नसते. ईयोब म्हणत आहे की तो पुन्हा तरूण झाला असता तर बरे झाले असते, कारण तरूणपणात देवाची गुपिते त्याला प्रगट होत असत. (ईयोब 29:4). 

    केनेथ हेगिन यांनी वर्णन केले आहे की कशाप्रकारे त्यांना 1950 ते 1958 च्या दरम्यान देवाने त्यांना येशू ख्रिस्ताचे आठ दृष्टांत देउन आशीर्वादीत केले होते. त्यांनी वर्णन केले आहे की 1958 पासून परमेश्वराने त्यांना अशाप्रकारे दर्शन दिले नाही. परमेश्वराने दर्शन दिले तेव्हा केनेथ हेगिन हे केवळ तेहतीस वर्षाचे होते. ते शायंषी वर्षाचे होईपर्यंत त्यांनी सेवा केली.

    तरूण व्यक्ती असतांना गुपिते हेरणे हे महत्वाचे आहे. जेव्हा तुम्ही तरूण असता, तेव्हा तुमचे संपुर्ण जीवन तुमच्यापुढे असते. जी गुपिते आणि प्रकटीकरण परमेश्वर तुम्हाला दाखवितो ती प्रत्यक्षात उतरतविण्याची तुम्हाला चांगली संधी असते. मी शाळेत होतो तेव्हा मला मत्तय 6:33 मधील रहस्य समजले. देवाला प्रथम शोधणे आणि त्याच्या राज्याची प्रथम उभारणी करणे हे भरभराटीचे रहस्य आहे.

    5. प्रार्थना ही देवाचे महत्वपुर्ण गुपिते शोधण्याची महत्वपूर्ण किल्ली आहे. 

    ‘‘यावर दानिएलाने आपल्या घरी जाऊन आपले सोबती हनन्या, मीशाएल व अज-या यांस ही हकीकत कळविली. आणि बाबेलाच्या इत्तर ज्ञान्यांबरोबर आपला व आपल्या सोबत्यांचा घात होऊ नये म्हणून दानीएलाने त्यांस विनंती केली की या रहस्यासंबंधाने स्वर्गीय देवाने आपणांवर दया करावी असे त्याजजवळ मागावे. मग रात्री दुष्टांतात हे रहस्य दानीएलास प्रगट झाले; त्यावरून दानीएलाने स्वर्गीय देवाचा धन्यवाद केला. दानीएल म्हणाला, देवाचे नाम युगानुयूग धन्यवादीत असो; कारण ज्ञान व बल ही त्याचीच आहेत; तोच प्रसंग व समय बदलतो; तो राजास स्थानापन्न अथवा स्थानभ्रष्ट करितो; तो ज्ञान्यास ज्ञान देतो व बुध्दिमानास बुध्दि देतो. तो गहन व गूढ गोष्टी प्रगट करितो; अंधारात काय आहे हे त्याला ठाऊक असते; त्याच्याजवळ प्रकाश वसतो.

    दानीएल 2:17-23

    जेव्हा दानीएल आणि

    Enjoying the preview?
    Page 1 of 1